• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Thursday, May 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

yogesh by yogesh
May 14, 2026
in माझं कोकण
A A
0
नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

राजापूर : प्रतिनिधी 

तालुक्यातील नाणार, कुंभवडे व सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांनी उभारलेल्या तीव्र जनआक्रोशाची अखेर शासनाला दखल घ्यावी लागली असून, प्रस्तावित जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे स्थानिक जनतेच्या एकजुटीचा आणि कोकणप्रेमी जनतेच्या संघर्षाचा मोठा विजय आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी, बागायतदार व प्रशासनाच्या बैठकीत जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूरच्या वतीने पालकमंत्री मा. उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असताना तो प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, ही भूमिका आज पुन्हा अधोरेखित झाली आहे. यापूर्वी रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी उभारलेल्या ऐतिहासिक लढ्यामुळेच तो विनाशकारी प्रकल्प मागे घेण्यास शासनाला भाग पाडले गेले होते. त्याच धर्तीवर या बॉक्साईट प्रकल्पाविरोधातही जनतेने एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यापूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की, २० मे २०२६ रोजीची जनसुनावणी रद्द करण्यात आली नाही तर स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या सहभागातून ती उधळून लावण्यात येईल. शिवसेना नेते तथा सचिव मा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख श्री. रवींद्र डोळस व तालुका प्रमुख श्री. कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात व्यापक व तीव्र जनआंदोलन उभारण्याचा ठाम इशारा देण्यात आला होता. स्थानिक जनतेच्या तीव्र विरोधामुळे अखेर प्रशासनाला जनभावनेचा आदर करावा लागला. तथापि, केवळ जनसुनावणी रद्द होणे पुरेसे नसून, प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्प संपूर्णपणे रद्द करण्यात यावा, ही आमची ठाम भूमिका कायम आहे. कोकणच्या निसर्गाचा, बागायतींचा, जलस्रोतांचा व स्थानिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांच्या सहभागातून हा लढा प्रकल्प पूर्णपणे रद्द होईपर्यंत कायम ठेवण्यात येईल, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजापूरच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Tags: नाणारप्रकल्पबॉक्साइटशिवसेना
ShareSend
Previous Post

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

yogesh

yogesh

Related Posts

माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

May 11, 2026
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक
माझं कोकण

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

April 24, 2026
कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us