• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, June 5, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई गोवा महामार्ग : ठेकेदाराचा हलगर्जीपणा बेततोय जीवावर!

रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, अपघातांची मालिका सुरुच, अनेक पुलांची कामे रखडली

yogesh by yogesh
June 14, 2025
in माझं कोकण
A A
0
मुंबई गोवा महामार्ग : ठेकेदाराचा हलगर्जीपणा बेततोय जीवावर!

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा या भागातून जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गत रविवारी बावनदी येथील तीव्र उतारावर शिक्षकांच्या खासगी बसला गॅस वाहू टँकरने धडक देऊन अपघात झाला होता. येथे ठेकेदाराने रस्त्याची दुर्दशा करून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. असे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे महामार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या आणि रस्त्यावर चिखल होईल असे काम करणाऱ्या ठेकेदाराबद्दल नाराजीचे वातावरण आहे.

आरवली येथील गडनदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर संगमेश्वरपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी नदी आणि २० किलोमीटर अंतरावरील बावनदी येथील पुलांचेही काम अपूर्ण अवस्थेत आहे. निवळी घाटातील कामही बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे. तेथून पुढे लांजापर्यंतचे काम वेगाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पण प्रत्यक्ष लांजा बाजारपेठेतील उड्डाणपूल रखडला आहे. चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. पण चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ उड्डाण पुलाच्या बांधकामाचे गर्डर गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातामुळे या टापूतील कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. संपूर्ण महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून वर्षभर कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यात महामार्गावर काम करणारे ठेकेदार सुस्तावले आल्याचे चित्र आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा महामार्गाचे गेले १८वर्ष काम सुरु आहे. तरी हा महामार्ग पुर्ण होवू शकला नाही. संपुर्ण देशात हा महामार्ग आता चर्चेचा विषय बनला आहे. पावसाला सुरु झाल्याने आता या महामार्गाचे काम मंदावले आहे. मात्र संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा या ठिकाणी करण्यात आलेल्या कामांमुळे रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावरच चिखल आल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या चिखलामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ठेकेदार कशापद्धतीने चुकीचे काम करत आहे त्याची चर्चा येथे आहे.

Tags: नितीन गडकरीमहामार्गमुंबई - गोवा महामार्गरत्नागिरी
ShareSend
Previous Post

राजकीय विरोधकांना उदय सामंत यांचा धोबीपछाड!

Next Post

ना. उदय सामंत यांची शिष्टाई सफल, बच्चू कडूंचं उपोषण स्थगित

yogesh

yogesh

Related Posts

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!
माझं कोकण

तळकोकणाच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प!

May 19, 2026
नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना
माझं कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा कायम : उबाठा शिवसेना

May 14, 2026
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय
माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

May 11, 2026
भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
Next Post
ना. उदय सामंत यांची शिष्टाई सफल, बच्चू कडूंचं उपोषण स्थगित

ना. उदय सामंत यांची शिष्टाई सफल, बच्चू कडूंचं उपोषण स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us