• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

गोवंश मांसप्रकरणी नासिर मुल्लासह तिघांवर गुन्हा

yogesh by yogesh
June 4, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

रत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील एकता नगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत गोवंश मांस सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वॉचमन दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

काल (३ जून) संध्याकाळी मारुती मंदिर नजीकच्या एकता मार्ग येथे गोवंश पाय टाकलेला आढळून आल्याने सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच पोलिसही तात्काळ दाखल झाले.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यापैकी एक जण हातात पिशवी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले. या व्यक्तीचा शोध घेतला असता तो नजीकच्या यशोदा अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, पोलिसांना गोवंश मांसाचे अवशेष सापडले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मांस जप्त केले आणि वॉचमनच्या पत्नीला तात्काळ ताब्यात घेतले.

यानंतर पोलिसांनी वॉचमन आणि दुचाकीवरील इतर दोघांचा कसून तपास सुरू केला. मंगळवारी रात्री उशिरा वॉचमनसह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणामुळे रत्नागिरीतील सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून, तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

गोरक्षक सुशील कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत वॉचमनच्या घरात सापडलेले मांस गोमांस असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करून सविस्तर पंचनामा करून ते जप्त केल्याचा उल्लेख आहे. या घटनेत केवळ वॉचमन आणि त्याची पत्नी नसून, गोमातेची हत्या करणारे आणि गोमांस पुरवठा करणारे संपूर्ण रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करत, ते उघडकीस आणून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी आरती रणजीत दमाई, रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३२५, २३८, ३ (५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए, ५ बी, ५ सी, ९ ए आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: गोवंशगोहत्यामांस
ShareSend
Previous Post

रत्नागिरी एसटी आगार व्यवस्थापकाची मनमानी, तब्येत बिघडल्याने चालक रुग्णालयात

Next Post

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us