• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, April 12, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी एसटी आगार व्यवस्थापकाची मनमानी, तब्येत बिघडल्याने चालक रुग्णालयात

पूर्वकल्पना देऊनही आगारप्रमुखांनी त्रास होईल अशी लावली ड्युटी,प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्दाम आगारप्रमुखावर वचकच नाही. 

yogesh by yogesh
June 4, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरी एसटी आगार व्यवस्थापकाची मनमानी, तब्येत बिघडल्याने चालक रुग्णालयात

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी एसटी आगरप्रमुखाच्या मनमानीचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यातच आता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा एक प्रकार उघड झाला आहे. आगरप्रमुख संदीप पाटील यांना पूर्वकल्पना देऊनहीं आजारपणातून दोन दिवसांपूर्वीच बाहेर आलेल्या चालकाला ग्रामीण ड्युटी देण्यात आली. त्यानंतर ही ड्युटी करून बसस्थानकात आलेल्या चालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ एसटी प्रशासनावर आली. आगारप्रमुखाच्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या प्रतापामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या मनमानी करणाऱ्या आगारप्रमुखावर डीसी बोरसे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

बस सुरू असताना आणि प्रवाशी बसमध्ये असताना ठाकुरदेसाई यांना त्रास झाला असता तर? कल्पना न केलेली बरी! ठाकुरदेसाई यांना त्रास देण्याच्या प्रतापामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी ही घटना आहे. आगारप्रमुख संदीप पाटील याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशी करणार असल्याचे समजते.

दिनांक २१ मे रोजी आजारपणातून बाहेर पडलेल्या एसटी चालक ठाकुरदेसाई यांनी रूजू होताना मला थोडा त्रास होत आहे, तेव्हा मला शहरी वाहतूक सेवा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना शहरी वाहतूक देण्यात आली. दरम्यानच्या काळात ठाकुरदेसाई यांच्याविरोधात एका माजी एसटी कर्मचाऱ्याने लेखी तक्रार केली. त्या माजी कर्मचाऱ्याने स्वतः शिवीगाळ करून उलट तक्रार दिली होती. यावर ठाकुरदेसाई यांनी त्या माजी कर्मचाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र या दोन्ही गोष्टींचा विचार न करता ठाकुरदेसाई यांना शहरी वाहतुकीतून ग्रामीण वाहतुकीसाठी बदली करण्यात आले. सेवाज्येष्ठता, आजारपण असताना शहरी वाहतूक करणे शक्य होते. मात्र सलग लांब मार्गाची वाहतूक करणे ठाकुरदेसाई यांना अडचणीचे जात होते. याबद्दल त्यांनी आगारप्रमुख पाटील यांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र तरीही जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने ठाकुरदेसाई यांना ग्रामीण वाहतूक देण्यात आली. काल ड्युटी करून आल्यावर बस स्थानकात गाडी आली आणि ठाकुरदेसाई यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यांना गाडीतून खाली उतरताही येत नव्हते. शेवटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठाकुरदेसाई यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आगार प्रमुखाच्या मनमानीचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहेच, परंतु हा प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या मनमानी करणाऱ्या आगारप्रमुखावर डीसी बोरसे काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Tags: उदय सामंतएकनाथ शिंदेएसटीएसटी कर्मचारीकिरण सामंतदेवेंद्र फडणवीसप्रताप सरनाईक
ShareSend
Previous Post

राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

गोवंश मांसप्रकरणी नासिर मुल्लासह तिघांवर गुन्हा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

गोवंश मांसप्रकरणी नासिर मुल्लासह तिघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us