रत्नागिरी : प्रतिनिधी
निलंबित शिक्षक कम तोतया पत्रकार प्रवीण रावसाहेब किणेचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. लकी ड्रॉ कूपन काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेच, शिवाय एक सात लाखाच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यात एका शिक्षकाला एकाचे पाच लाख करून फसवल्याचे प्रकरण असताना तसेच पण थोडे वेगळे प्रकरण पुढे आले आहे. एका महिला शिक्षक सहकाऱ्याला एका कर्ज प्रकरणात जामीन करण्यात आला. इतकेच नव्हे तर जामीन असलेल्या त्या शिक्षक महिलेला त्याची कल्पना तर नव्हतीच, जेव्हा पतसंस्थेकडून तिला हफ्ते थकल्याबाबत नोटीस आली. तेव्हा असले प्रवीण किणे याचे येडेखुळे पाहून महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. त्या महिलेने थेट पतसंस्था गाठली…
पतसंस्था गाठल्यावर तिथे मला अशी जामीन असल्याची नोटीस का पाठवली आहे? असा जाब त्या शिक्षक महिलेने विचारला. त्यानंतर जे कळले ते पाहून कुणाचेही धाबे दणाणले असते. लाखोंचे कर्ज घेण्यास लायकी लागते. ती लायकी सिद्ध करण्यासाठी लायक जामीन लागतो. त्यामुळे लाखोंचे कर्ज घेण्यासाठी खोटा जामीन या नराधमाने दिला होता. चक्क त्या महिलेची जामीन म्हणून खोटी सही करण्यात आली होती. पतसंस्था मुळातच गडबड गोंधळ करणारी असा नावलौकिक असल्याने महिलेच्या जामीन करण्यात तिथल्या काहीजणांचा वाटा असू शकतो. मात्र खोटे बोलण्यात, फसवणूक करण्यात, चोरी करण्यात, पोषण आहार खाण्यात, लकी ड्रॉ कूपन करण्यात प्रवीण असलेल्या किडीपासून त्या महिलेला त्रास झालाच! या कर्ज बोगस जामीन प्रकरणात ती महिला घाबरून गेली. मात्र पतसंस्थेला घाम फोडल्याने तूर्तास तिच्यावरचा प्रसंग तात्पुरता टळला आहे. यात महिलेची खोटी सही करणे गुन्हा आहे, अर्जाची आणि जामिनाची पडताळणी न करणे हाही गुन्हा आहे, शिवाय आधीच चुकीची आणि खोटी प्रकरणे करण्यात प्रवीण असलेल्या सायको माणसाला पुन्हा कर्ज देणे हा ही गुन्हा नव्हे काय? आता अशा प्रवृत्तीच्या आणि वागणुकीच्या नराधमाला निलंबित करतील नाही तर काय?





