रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गौणखनिजाचे उत्खनन करून शासनाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) थकवणाऱ्यांना महसूल विभागाने दणका दिला असून, जिल्ह्यातील ९१ जणांना २८ कोटी ४ लाख ७० हजार २३१ रुपयांची रॉयल्टी थकवल्याबद्दल त्यांना दंडासह थकीत रॉयल्टी भरण्याच्या नोटीस खनिकर्म विभागाकडून सर्व तहसीलदारांमार्फत बजावण्यात आल्या आहेत. दिनांक ३१ मार्चपर्यंत ही रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
गौणखनिज उत्खनानंतरही गेली दोन वर्षे ही थकबाकी आहे. महसूल मंत्र्यांनी महसूल विभागाला थकीत रॉयल्टी तत्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. गुहागर तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये थकबाकी आहे.
खनिकर्म विभागाकडून उत्खननाचा परवाना अनेकांनी मिळवला. काहींनी अतिरिक्त उत्खनन केले आहे, त्यांना तहसीलदारांनी दंड केला होता.या दंडाविरुद्ध प्रांतांकडे अपील करण्यात आले. मात्र, या अपिलानंतरही दंड कायम राहिलेला आहे, अशीही यात प्रकरणे आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारे ९१ जणांनी रॉयल्टी थकवल्याची यादी महसूल विभागाने तयार केली आहे. त्यांची माहिती संबंधित तहसीलदारांना देण्यात आली असून, त्यांच्याकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात मार्चअखेरपर्यंत दंडासहित ही रक्कम भरावी, असे नमूद केले आहे.
गौणखनिज उत्खनानंतरही गेली दोन वर्षे ही थकबाकी आहे. महसूल मंत्र्यांनी महसूल विभागाला थकीत रॉयल्टी तत्काळ वसूल करण्याचे आदेश ही कारवाई करत दंडासहीत रक्कम दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




