• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

मराठीतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

दामले विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी

yogesh by yogesh
January 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
मराठीतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

रत्नागिरी : प्रतिनिधी

विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.आपले शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, आता आपण उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे मराठी शिक्षण आपल्याला समृद्ध करते. याच मराठी भाषेतील शिक्षणाने उच्च पदापर्यंत पोहोचवले, असे मत उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत येथील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यानिमित्त आयोजित व्यासपीठावर मराठी भाषा समिती सदस्य आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. कासार, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसाप केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, अरुण मोरये, दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी नगर शिक्षण मंडळातर्फे सुमारे एक हजार पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन श्रीमती साठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दामले विद्यालयातर्फे ग्रंथदिंडीचे मारुती मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले.

दामले विद्यालयासारखी मराठी माध्यमाची शाळा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण क्षेत्रात चौफेर आपला ठसा उमटवते, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. दामले विद्यालयाचे काम आदर्शवत असल्याचेही त्या म्हणाल्या.

श्री. पाटील यांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेपर्यंतचा प्रवास मुलांसमोर सोप्या भाषेत उलगडला. विद्यार्थ्यांनी रोज वाचण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार म्हणाले. आभार मुख्याध्यापक श्री. मोटे यांनी मानले.

Tags: दामले शाळापंधरवडामराठीमराठी भाषा
ShareSend
Previous Post

आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

Next Post

पन्हळेतील अनधिकृत मदरसाविरोधात उपोषण सुरूच

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
पन्हळेतील अनधिकृत मदरसाविरोधात उपोषण सुरूच

पन्हळेतील अनधिकृत मदरसाविरोधात उपोषण सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us