• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

yogesh by yogesh
January 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
आरोग्य जनजागृती नाट्यस्पर्धा स्तुत्य उपक्रम : न्या. गोसावी

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणी माणूस व नाटक यांचा जवळचा संबंध आहे. अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. विविध आजार व आजारांबद्दल समज, गैरसमज व त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा आयोजित केले, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी काढले.

जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन २०२५ निमित्त आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली.या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, आय. एम. अध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. अलिमिया परकार आदी उपस्थित होते.

या नाट्यस्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय यांनी पटकविला, विजेत्या संघाला प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ८ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक यश फांउडेशन नर्सिंग कॉलेज यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ५ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक पटवर्धन कॉलेज यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये ३ हजार व सन्मानचषक प्रदान करण्यात आला.

न्यायाधीश श्री. गोसावी म्हणाले, आरोग्य विभागाने पुढाकार घेवून अशा पध्दतीने जनजागृती करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी हा स्तुत्य कार्यक्रम असून असे उपक्रम निरंतर व्हावे असे सांगितले.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ यांनी उद्दिष्ट व नियोजनबाबत प्रस्तावना केली. या नाट्य स्पर्धेकरिता डॉ. परकार डॉ. ढगे, डॉ. विकास कुमरे हे परीक्षक म्हणून लाभले. विविध महाविद्यालये, जिल्हा शासकिय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा १६ संघानी आरोग्य जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिरसाठ, सचिन पाटिल, सतीश कांबळे, सचिन भरणे, रामेश्वर म्हेत्रे, राम चिंचोले आदीनी परिश्रम घेतले.

Tags: आरोग्यनाट्य स्पर्धारत्नागिरीविधी
ShareSend
Previous Post

लांजा, राजापूर शहरे होणार ‘स्मार्ट’

Next Post

मराठीतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
मराठीतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

मराठीतून शिक्षण विद्यार्थ्याला समृद्ध करते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us