• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

मिऱ्या एमआयडीसीसाठी भूसंपादन थांबवा- बाळ माने

उद्योगमंत्र्यांकडून मिऱ्यावासियांना त्रास, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

yogesh by yogesh
August 25, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
मिऱ्या एमआयडीसीसाठी भूसंपादन थांबवा- बाळ माने

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील मिऱ्या गावात परस्पर नोटिसा आल्या आहेत. पर्यटन व्यवसाय करायचा असेल तर उद्योगखात्याकडून भूसंपादन कशाला? वाटदप्रमाणे मिऱ्याचे लोक मंत्र्यांच्या पायाशी यावेत यासाठी हे सर्व सुरू आहे. याबाबत काहीतरी गडबड वाटत आहे. आम्हाला उद्योग हवे आहेत; परंतु मिऱ्या एमआयडीसीसाठी भूसंपादन थांबवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

मिऱ्या येथे पोर्ट प्रकल्प आणण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. माने यांनी थेट सामंतांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, रिफायनरीला विरोध नंतर समर्थन, वाटदला विरोध नंतर समर्थन अशा भूमिकेमुळे उद्योगमंत्री सामंत यांच्या हेतूबद्दल मी साशंक आहे. मिऱ्या येथे भारती शिपयार्ड कंपनीची वाट लागली, भंगार विकावे लागले त्या वेळी कंपनी उभी राहण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आम्हाला मिऱ्याचा विकास करायचा असेल तर पर्यटन व्यवसायासाठी आम्ही प्रयत्न करू, संबंधितांशी चर्चा करू. मिऱ्या येथे कोणतीही शक्याशक्यता नसताना उद्योगमंत्री यांनी जाणीवपूर्वक मतदार व मला त्रास देण्याकरिता अशा प्रकारचे नियोजित एमआयडीसी करण्याचे षडयंत्र रचले आहे. या विषयाची सखोल चौकशी करून संबंधित भूसंपादनाचे आदेश तत्काळ थांबवावे, अशी मागणी माने यांनी केली आहे.

एमआयडीसीत ५० टक्के भूखंड रिकामे

एमआयडीसीच्या मिरजोळे व झाडगाव या दोन औद्योगिक वसाहती रत्नागिरी शहरालागत आहेत. त्यामधील सुमारे ५० टक्के भूखंड अद्यापही रिकामे आहेत. जे भूखंड उद्योजकांसाठी वितरित केले आहेत त्यामध्ये कोणतेही उद्योग संबंधित उद्योजकांनी सुरू केलेले नाहीत. सुमारे १०-१५ टक्के भूखंडामध्ये फक्त नाममात्र उद्योग सुरू आहेत. अशाप्रकारे तिसरी म्हणजे सडामिऱ्या व जाकिमिऱ्या या गावातील भूसंपादन होऊन औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने २९ जुलैला काढलेल्या मिऱ्या (सडामिऱ्या) व जाकिमिऱ्या येथील एमआयडीसीबाबत शासननिर्णय रद्द व्हावा. गावामध्ये हापूस कलमांच्या बागा ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीने लागवड करून जोपासल्या आहेत. मिऱ्या गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. पूर्व बाजूला खाडी तर पश्चिम व उत्तर बाजूला समुद्रकिनारा आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ हंगामी हापूस आंब्याच्या व्यवसायासोबत मच्छीमारीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात.

मिऱ्या गावालगत मिरकरवाडा या ठिकाणी १९८०पासून भगवती बंदर येथे कार्गो बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी एल अॅंड टी कंपनीची लिंकर जेटी आहे. तेथे नियोजित बंदर प्रगतीपथावर आहे. रत्नागिरीपासून समुद्रमार्गे १० किमीवर जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट आहे. या पोर्टचा सर्वांगीण विकास अद्यापही होणे बाकी आहे. जेएसडब्ल्यू जयगड पोर्टसाठी निवळी ते जयगड ४५ किमी चारपदरी रस्ता अद्यापही झालेला नाही. डिंगणी-जयगड नियोजित रेल्वे अद्यापही लॉजिस्टिक पार्कसाठी झालेली नाही. या ठिकाणी जयगड व सांडेलावगण लॉजिस्टिक पार्क रेल्वे कनेक्टिव्हिटी व ४ लेन रस्ता कनेक्टिव्हिटी होणे आवश्यक आहे, असे माने यांनी सांगितले.

Tags: उदय सामंतएमआयडीसीबाळ मानेभाजपशिवसेना
ShareSend
Previous Post

राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही : मुंबई हायकोर्ट

Next Post

मालवण येथील छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने खळबळ

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

मालवण येथील छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us