• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

अजिंक्य तळेकरच्या आत्महत्येस जबाबदार कोण?

वरळी पोलीस तपासात हलगर्जीपणा, मनीष तळेकर यांचे आमरण उपोषण

yogesh by yogesh
August 15, 2024
in माझं कोकण
A A
0
अजिंक्य तळेकरच्या आत्महत्येस जबाबदार कोण?

रत्नागिरी : प्रतिनिधी

आपल्या मुलाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संशयीतांची सखोल चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी वडिलांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. वरळी मुंबई पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला आणि चुकीच्या दिशेने तपास केला असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे असून मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्व संशयीतांवर गुन्हा दाखल तरी कधी होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलीस हलगर्जीपणा करत असल्याने याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय कारवाई करणार हा नेमका प्रश्न अनुत्तरीत आहे.

अजिंक्य मनीष तळेकर त्याने वरळी कोळीवाडा येथील आपल्या राहत्या खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या प्रेम संबंधातून झाल्याचा आरोप मृत मुलाचे वडील मनीष जगन्नाथ तळेकर यांनी केला आहे. त्यानुसार वरळी पोलीस कारवाई करण्यात कुचराई करत असल्याने तळेकर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आमरण उपोषणाला स्वातंत्र्यदिनी सुरुवात केली. मनीष तळेकर यांनी उपोषणाचा इशारा देताना जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की खेडशी येथील सिद्धी नावाच्या एका मुलीशी अजिंक्यचे प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या वडिलांनी हे प्रेमसंबंध मान्य नसल्याने अजिंक्यला मे २०२३ ला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर अजिंक्यला मुंबई येथे पुढील शिक्षणासाठी त्याची बहीण रिद्धीकडे पाठवण्यात आले. दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी रिद्धीचे लग्न झाल्याने अजिंक्य ची आई मुंबई येथे अजिंक्यसोबत राहण्यासाठी गेली. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० ते ८.१५ वाजण्याच्या दरम्यान अजिंक्यने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर अजिंक्यचे मित्र फैसल,साहिल आणि विवेक या ठिकाणी अजिंक्यची प्रेमिका सिद्धी ही अजिंक्य मुंबईला गेल्यावर अपूर्व नावाच्या एका मुलाशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्यांचे फोटो अजिंक्यला स्नॅपचॅटवर टाकून जळवत होती. वारंवार अजिंक्य ला मानसिक त्रास देत होती. त्यामुळे अजिंक्यने वापरलेले स्नॅपचॅट चेक केले असता अजिंक्य आणि आत्महत्या करण्यापूर्वी १ फेब्रुवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२४ या मुदतीत सिद्धीला आत्महत्या करणार असल्याचे स्नॅपचॅट द्वारे व फोन द्वारे सांगितले होते. दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मी तीन वेळा फास लावून घेतला. मी काही मेलो नाही असे अजिंक्यने सिद्धीला सांगितले होते. त्यावर सिद्धीने करत रहा मला काही फरक पडणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सिद्धीला हे आत्महत्या करण्याचे विचार अजिंक्यच्या डोक्यात आहेत हे माहीत असताना त्याची कल्पना अजिंक्यच्या पालकांना म्हणजेच मनीष तळेकर, अंजली तळेकर किंवा रिद्धी तळेकर यांना तिने दिली नाही. त्यामुळे अजिंक्य याला आत्महत्या करण्यास तिने प्रवृत्त केले असल्याचा आरोप मनीष तळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

ही सगळी घटना घडल्यानंतर अजिंक्यचे मित्र साहिल फैसल विवेक सिद्धीची मैत्रीण इकरा यांना अजिंक्यने आत्महत्या करण्यापूर्वी मेसेज करून व स्नॅपचॅट वर हातावर ब्लेडचे वार केलेले दाखवले होते. तसेच गळफासाचे फोटो टाकून मी गळफास लावत आहे असे सांगितले होते. तरीसुद्धा या मित्रांनी स्वतःच्या घरच्यांना किंवा अजिंक्यच्या घरच्यांना काहीच कल्पना दिली नाही. फैसल जवळ चौकशी केली असता, आत्महत्या पूर्वी तीन दिवस आधी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी अजिंक्य आणि सिद्धीचे फोनवर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी फैसल फोनवर कॉन्फरन्स कॉल द्वारे त्यांचे बोलणे ऐकत होता ही माहिती फैसलने तळेकर यांना दिली.

घटना घडूनही पाच महिने झाले तरी गुन्हा दाखल झाला नाही मग यंत्रणा खरंच झोपी गेले का? आत्महत्या करून जीव गेलेल्या अजिंक्यचा कुणाला काही पडलेलेच नाही का? पोलीस त्यांच्या कामात कुचराई करत असताना एक वडील, एक आई, बहिण आपल्या मुलाला न्याय मिळावा आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी अखेर आमरण उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर बसले. आता न्यायव्यवस्थेप्रमाणे पोलीसही डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालून अजिंक्यला न्याय द्यावा अशी मागणी अजिंक्यच्या पालकांनी केली आहे.

अजिंक्यने आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर सम्यक नावाच्या अजिंक्यच्या मित्राला अजिंक्यने कॉल केला होता. त्यामुळे तळेकर हे सम्यक च्या घरी जाऊन अजिंक्य त्याच्याशी काय बोलला त्याबद्दल माहिती घेतली. अजिंक्यने डिसेंबर २०२३ ला सिद्धी हिचे प्रेम संबंध असलेला मुलगा अपूर्व याला फोन केला होता. त्यावेळी अपूर्वने त्याचा फोन त्याच्या मामाकडे दिला अपूर्वाच्या मामाने अजिंक्यला फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून अजिंक्य हा खूप टेन्शनमध्ये होता असे सम्यकने तळेकर यांना सांगितले. त्यामुळे अजिंक्य यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी सिद्धी तिचे कुटुंबीय यांची चौकशी होऊन त्यांच्यावर तसेच त्यांच्यासोबत अपूर्व व त्याचा मामा यांच्यावर अजिंक्य ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मनीष तळेकर यांनी केली आहे.

पोलीस तपासात हलगर्जीपणा कोणत्या दबावापोटी?

दादर पोलीस ठाणे येथे तळेकर यांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी रिचार्ज तक्रार देऊनही तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दादरचे अंकुर शेडगे यांनी चौकशी किंवा तपास न करता तळेकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी ५६ दिवसांनी सिद्धीचा थातूरमातूर जबाब देऊन घेतला. तक्रार अर्जात नमूद केलेल्या अजिंक्यच्या मित्रांची जबानी आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. शिवाय अजिंक्य गळफास लावलेला रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे होते त्याचे फुटेजही तपास अधिकाऱ्यांनी चेक केलेले नाही. अजिंक्यचा मोबाईल कॉल व स्नॅपचॅटचे मेसेज चेक करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये दिलेला आहे त्याचा रिपोर्ट आलेला नाही असे पोलिसांनी तळेकर यांना सांगितले. त्यामुळे या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. पोलिसांना पुरावे देऊनही पोलीस म्हणतात, कोणतीही माहिती किंवा पुरावे चौकशीत मिळून आलेले नाहीत त्यामुळे सबब नमूद प्रकरणी दखलपात्र अपराध नोंद करून तपास करणे कायदेशीर नाही. मग दिलेले पुरावे जाणून-बुजून का तपासले नाहीत? अजिंक्यचा मोबाईल ओपन केला मग त्यामध्ये भरपूर पुरावे आहेत. अजिंक्यने सर्व मोबाईलमध्ये सेव करून ठेवलेले आहेत, याची चौकशी व्हावी अशी मागणी असताना सुद्धा पोलीस दुर्लक्ष का करत आहेत? यामागे पोलिसांची भूमिका नक्कीच संशयस्पद असल्याचे तळेकर यांचे म्हणणे आहे.

Tags: जिल्हाधिकारीमुंबई पोलीसरत्नागिरी
ShareSend
Previous Post

राजापुरात पोलिसांची तिरंगा जनजागृती रॅली

Next Post

मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

मनसेचा रत्नागिरी रस्ते आस्थापना विभाग जोमात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us