राजापूर : प्रतिनिधी
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविण्यात येणाऱ्या तिरंगा अभियानाचे शासकीय अधिकारी जी ओतून प्रसार प्रचार करत आहेत. राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार हर घर तिरंगा अभियान राजापूर पोलीस ठाणे ते जवाहर चौक, बाजारपेठ ते मुंशी नाका, गणेश घाट ते पोलीस ठाणे अशी बाईक रॅली काढून जनजागृती केली.
प्रत्येक घरात १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून एकतेचा संदेश सर्व देशात पसरविण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे आहे. राजापूर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी काढलेल्या रॅलीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी केले. या रॅलीत सर्व पोलीस अधिकारी अमलदार शिपाई सहभागी झाले होते. तिरंगा बाईक पर हातात घेऊन शहरभर रॅली द्वारे जनजागृती करण्यात आली.