रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालय व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज घरोघरी तिरंगा जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दामले विद्यालयातील ३०० विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. तुषार बाबर , नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री सुनील पाटील, मुख्याध्यापिका सौ. नीलम जाधव , शिक्षक वृंद ; तसेच नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीचा मार्ग दमले विद्यालय – मारुती मंदिर – गोडबोले स्टॉप – परकार हॉस्पिटल – आरोग्य मंदिर ते पुन्हा दामले विद्यालय असा ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घोषणा देत तिरंग्याविषयीचा अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला.