रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १७९ पदांची भरती सुरू असून या भरतीत ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा होणार असून दहा गुणांची मुलाखत होणार आहे. त्यावर अनेक शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी यावर ही भरती पारदर्शकपणे होईल, असे बँकेतर्फे गजानन पाटील यांनी ‘रत्नदर्पण न्युज’शी बोलताना सांगितले.
दरम्यान परीक्षेच्या फॉर्म भरते वेळी लॉगिन करताना ज्या सूचना देण्यात आले आहेत, त्या सूचनांमध्ये चुका असल्याचे निदर्शनात आल्याने अनेक परीक्षार्थींचा संभ्रम झाला होता. त्या सूचनांमध्ये एकूण एक मिनिटाचा कालावधी परीक्षेचा असेल. एकूण सहा प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असेल. एकूण परीक्षा सहा गुणांची असेल. चुकीचे उत्तर दर्शवल्यास कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. प्रश्नास प्रतिसाद न दिल्यास कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. या सूचना लॉगिन करताना दिले आहेत त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत रत्नदर्पण न्यूजने वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेत ही परीक्षा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १७९ पदांची भरती सुरू असून या भरतीत ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा होणार असून दहा गुणांची मुलाखत होणार आहे. त्यावर अनेक शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी यावर ही भरती पारदर्शकपणे होईल, असे बँकेकडून गजानन पाटील यांनी ‘रत्नदर्पण न्युज’शी बोलताना सांगितले.