• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरीचा विकास हीच बापूसाहेबांना भावांजली

माजी आ. बाळासाहेब माने : स्व. बापूसाहेब परुळेकर यांना अभिवादन

yogesh by yogesh
August 13, 2024
in माझी रत्नागिरी, होम
A A
0
रत्नागिरीचा विकास हीच बापूसाहेबांना भावांजली

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीचे माजी खासदार ऍड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण. यानिमित्त बापूसाहेबांना वंदन करतो. रत्नागिरीच्या विकासाकरिता त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून काम केले. त्यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भाजपाच्या कमळ निशाणीवर नारायण राणे हेसुद्धा निवडून आले. या साऱ्यांची प्रेरणा, आशीर्वाद घेऊन मार्गक्रमणा करत आहोत, रत्नागिरीच्या विकासाकरिता कटिबद्ध राहणे ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले.

शहरातील लक्ष्मी चौक परिसरातील परुळेकर यांच्या निवासस्थानी आज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळ माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी बापूसाहेबांचे सुपुत्र  बाबासाहेब परुळेकर,  निनाद शिंदे, गुरु शिवलकर, विक्रम मयेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे उपस्थित होते. यावेळी माने म्हणाले की, बापू जनसंघामध्ये १९५२ पासून सक्रिय होते. आणीबाणीनंतर जनता पक्षातून ते १९७७ आणि १९८० मध्ये खासदार झाले. ९६ वर्षी २७ जुलैला त्यांचे निधन झाले. आज तिथीनुसार त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात भाजपाचे काम करताना बाबासाहेब परुळेकर व आम्ही एकत्र असतो. विधीज्ञ म्हणून बापूसाहेबांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारची आहे. कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक होते. त्यांच्याच मार्गाने प्रवास करत आहोत. कोकणात, रत्नागिरीमध्ये भाजपाला चांगले दिवस यावेत. बापूसाहेबांनंतर कमळ निशाणीवर खासदार नारायण राणे विजयी झाले. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून त्यांची प्रेरणा, आशीर्वाद घेऊन मार्गक्रमणा करत राहू, ही बापूसाहेबांना खरी भावांजली ठरेल. वकीलीचा वारसा बापूंनी मोठा कसोशीने जपला. शिस्त, व्यासंग, मेहनत, आवाजावर हुकुमत, विरोधी मताबद्दल कमालीचा आदर या सर्वांमुळे वकिली व्यवसायात बापूंनी आदर्श निर्माण केला. बापूंनी जवळपास ६० वर्षे वकिली व्यवसाय केला. स्वा.सावरकर हा जगण्याचा आणि विचाराचा विषय आहे, असं ते नेहमी सांगत. ते जनसंघात सक्रिय होते. उत्कृष्ट वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती यांच्या जोरावर त्यांनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून मोहोर उमटवली. बापूंनी नगरपालिका, संसद, रत्नागिरी शिक्षण संस्था, पतितपावन मंदिर आदि संस्थांमध्ये स्वतःची वैचारिक भूमिका घेऊन काम केलं. त्यामुळे १९८० मध्ये ते खासदार झाले, असेही माने यांनी याप्रसंगी सांगितले.

Tags: भाजपभाजपारत्नागिरी
ShareSend
Previous Post

विशाळगड अतिक्रमण मुक्त करा

Next Post

पालघरचे उपजिल्हाधिकारी लाच घेताना जाळ्यात

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
पालघरचे उपजिल्हाधिकारी लाच घेताना जाळ्यात

पालघरचे उपजिल्हाधिकारी लाच घेताना जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us