सावर्डे : प्रतिनिधी
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता बस स्थानक सावर्डे ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे मुक निदर्शने करण्यात आली. यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली, या निदर्शनामधे समितीचे कार्यकर्ते व धर्मप्रेमी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला, तसेच यामधे भाजपचे कार्यकर्ते श्री. उदय घाग आणि श्री. प्रसन्न जाधव, तसेच मनसेचे कार्यकर्ते श्री. सागर जंगम यांनीही सहभाग दर्शवला.
या फलकांवर ‘अब याचना नही रण होगा । विशाळगड अतिक्रमण मुक्त होगा ।’, ‘मुक्त झाला प्रतापगड; आता वाट पहातोय विशाळगड !’ ,’विशाळगड प्रकरणी शिवभक्तांवर केलेली कारवाई मागे घ्या!, ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा !’ , अशा प्रकारचे जागृतीपर लिखाण लिहिण्यात आले होते.
हिंदू जनजागृती समिती गेली २१ वर्षे समाजात जनप्रबोधन व धर्मजागृतीचे कार्य करीत आहे. समितीच्या वतीने साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग, लहान मुलांसाठी बालसंस्कारवर्ग विनामूल्य घेतले जातात. राष्ट्रध्वजाच्या अवमान रोखणे, देवतांचे विडंबन रोखणे, समाजात राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम जागृत करणे यासाठी समितीतर्फे विविध मोहिमा राबवल्या जातात.




