उल्का विश्वासराव : भाजप पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार स्थानिक देण्याची मागणी
राजापूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ हा भाजपालाच मिळावा स्थानिक उमेदवार असावा, अशी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी असून त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. आणि आपल्याला खात्री आहे की पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल. आमची इच्छा पूर्ण होईल असा ठाम विश्वास भाजपाच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्काताई विश्वासराव यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे पदवीधर निवडणुकीत देखील भाजपाला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाला या विधानसभा मतदारसंघात ५४ हजारांचे मतदान झाले आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्ष विजयाची ‘मॅजिक फिगर’ नक्कीच गाठू शकतो असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला मिळावा आणि स्थानिक उमेदवार असावा अशी आपल्यासह मतदारसंघातील सर्व तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे पदवीधर निवडणुकीत देखील भाजपाला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाला या विधानसभा मतदारसंघात ५४ हजारांचे मतदान झाले आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्ष विजयाची ‘मॅजिक फिगर’ नक्कीच गाठू शकतो असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला मिळावा आणि स्थानिक उमेदवार असावा अशी आपल्यासह मतदारसंघातील सर्व तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी आहे.
आपण जेव्हा गावागावात जातो तेव्हा आपल्या लक्षात येते की देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालावधी उलटला तरी जनतेच्या बेसिक सुविधा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी नसलेला स्थानिक उमेदवार हेच आहे. आता येथील जनता बाहेरच्यांना पूर्णपणे कंटाळलेली आहे. आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व पाहता हा मतदारसंघ भाजपालाच मिळावा आणि या ठिकाणी स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात असून तशा प्रकारची आपण वरिष्ठांकडे मागणी केली आहे. आणि आपल्याला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवर आम्हा कार्यकर्त्यांच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल. आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल असा ठाम विश्वास देखील उल्का विश्वासराव यांनी यावेळी व्यक्त केला. त्याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष आणि राजापूर पश्चिमचे प्रभारी महेश उर्फ मुन्ना खामकर, जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, सरचिटणीस तालुका विराज हरमले तसेच सरचिटणीस शैलेश खामकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेवक संजय यादव, उपाध्यक्ष सचिन आठल्ये, शिवगण, अनिल कांबळे, आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.




