• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

सद्गुरुंच्या सहवासातच जीवनाचे सार्थक : नरेंद्रचार्यजी महाराज

yogesh by yogesh
July 24, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

नाणीज : प्रतिनिधी

मनुष्य जन्म म्हणजे भगवंताने माणसाला सुधारण्यासाठी दिलेली एक संधी आहे. त्यासाठी सद्गुरुंच्या सहवासात रहा. तेच खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक करून देतात, असा उपदेश जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांना केला. गुरुपौर्णिमा सोहळ्याचा समारोप जगद्गुरू श्रींच्या अमृतमय प्रवचनाने झाला. दिवसभर जोरदार सुरू असलेला पाऊस या काळात थांबला होता. त्यामुळे सर्वांना प्रवचन चांगले ऐकता आले.

प्रवचनात श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले, सद्गुरूंचा उपदेश व सहवासाने या जीवनरुपी मिळालेल्या संधीचे सोने करता येते. म्हणजेच ते जीवनाचे खरे सार्थक करून देतात. शेतकरी जसे शेतातील तण काढतो तसे  सद्गुरू आपल्या शरीरातील त्रिगुण व तमो गुण काढतात वा कमी करतात. सत्वगुण, सात्विकताही योग्य मार्गाने वाढवतात जोपासतात. 

ते म्हणाले, संत नेहमी सांगतात माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. संत खरा माणुसकी धर्म आचरणात आणून देतात व आपल्यात आमूलाग्र बदल घडवून आणतात. म्हणून व्यास पौर्णिमा सद्गुरुंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते.
ते पुढे  म्हणाले,  मोक्ष मिळण्यासाठी त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन निःशेष व्हावे लागते. त्यासाठी सात्विकता हाच खरा मार्ग आहे. त्यात ज्ञान, दान, क्षमा, दया, शुद्धता, संयम, विनय, समाधान असे गुण दिसून येतात. सात्विकता ही संजीवनी म्हणून वापरली पाहिजे,अथवा आचर-विचारात आणली पाहिजे. आपल्यात कायिक, वाचिक व मानसिक सात्विकता असायला हवी.

यापूर्वी प.पू. कानिफनाथ महाराजांचे प्रवचन झाले. त्यांनी सद्गुरूंचे महत्व, त्यांचे मनुष्य जीवनातील महत्व, सद्गुरुंच्या चरणी लीन का व्हावे ते संगितले. सर्वात शेवटी देवाला साकडे घातल्यानंतर वारी उत्सवाची सांगता झाली.

Tags: नरेंद्राचार्य महाराजनाणिज
ShareSend
Previous Post

गावपातळीवर दाखले, अर्ज देण्याची व्यवस्था करा : सतेज नलावडे

Next Post

निर्मात्याची फसवणूक, जरांगे विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

निर्मात्याची फसवणूक, जरांगे विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us