• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

वरुणराजाच्या साक्षीने नाणीजक्षेत्री श्रध्दा – भक्तीचा सुंदर संगम

yogesh by yogesh
July 20, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

नाणीज : प्रतिनिधी

येथील सुंदरगडावर रविवारी भव्यदिव्य गुरुपौर्णिमा सोहळा होत आहे. त्याची सुरुवात शनिवारी ढोल ताशांच्या गजरात देवदेवतांना निमंत्रण देणाऱ्या मिरवणुकांनी झाली. भर पावसात येथे हजारो भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी मंत्रघोष  सुरू झाला अन सारे वातावरण श्रद्धा व स्नेहाने भारून गेले. आपल्या लाडक्या जगद्गुरूंचा जयघोष सुरू झाला. त्यानंतर श्री सप्तचिरंजीव महामृत्युंजय याग सुरू झाला. अन्नदान विधीही झाला. वेदशास्त्रसंपन्न भालचंद्रशास्त्री शौचेगुरुजी यांनी  त्याचे नेतृत्व केले.
सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सर्व देवदेवतांना रविवारच्या सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने जाऊन देण्यात आले.

रविवारी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. गुरुपूजन हेच उद्याचे मुख्य आकर्षण आहे. सकाळी ८.३० ते १२ पर्यंत संतपीठावर गुरुपूजन सोहळा आहे. भाविक संतपीठासमोर बसून विधिवत गुरुपूजन करतील. दुपारी चरणदर्शन व अन्य धार्मिक कार्यक्रम आहेत. रात्री ७.३० ला प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन होईल. सोहळ्याचा समारोप सर्वांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज  यांच्या अमृमय प्रवचनाने होणार आहे.

ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुका झाल्या. त्यात ध्वजधारी स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते. अनेक स्त्रियां हिरव्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून सुरु झाली.  निमंत्रण देऊन नाथांच्या माहेरमधून निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी हत्तीण नारायणी होती. ही मिरवणूक निमंत्रण देत वरद चिंतामणी मंदिर, पुढे प्रभू श्रीराम मंदिर मार्गे सुंदरगडावर संतशिरोमणी जमीन महाराज मंदिर येथे आली. नाथांचे माहेर मंदिराचे यजमानपदाची जबाबदारी उत्तर रायगड मधील भाविकांवर सोपविण्यात आली आहे.

वरद चिंतामणी मंदिराची सांगली जिल्हा सेवा समितीकडे, प्रभू रामचंद्र मंदिराची उत्तर नगरकडे आहे, तर मुंबई सेवा समितीने सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिराचे यजमानपद स्वीकारले  आहे. जोरदार पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वहात होता.

सकाळी सद्गुरू काडसिध्येश्वर महाराज रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर सुरू झाले. नामवंत डॉक्टरांचे पथक तपासणी व उपचार करीत आहेत. शिबीर उद्याही नऊ ते पाच या वेळेत सुरू आहे. भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद सुरू झाला आहे. येथे आठवडाभर जोराचा पाऊस आहे. तरीही भक्तांची पावले सुंदरगडाकडे वळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनाने भाविक येत आहेत. अगदी उद्या सकाळ पर्यंत गुरुपूजनाची पर्वणी गाठण्यासाठी भाविकांची गर्दी वाढतच राहील.  सर्वानाच आता उद्याच्या गुरुपूजनाचे वेध लागले आहेत.

Tags: नरेंद्राचार्य महाराजनाणीज
ShareSend
Previous Post

कोकण सुपुत्र ना. रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे भाजप प्रवक्तेपदी

Next Post

पैसे घे, पण लवकर दे!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

पैसे घे, पण लवकर दे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us