रत्नागिरी : प्रतिनिधी
भाजपा विरोधी अजेंडा राबवून विरोधक बदनामी करत असल्याने महाराष्ट्र भाजपाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन सत्रात प्रवक्त्यांची यादी करून त्यांची विभागणी करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे. विभागीय बाईट व पत्रकार परिषदेकरता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या आन्य नेत्यांचा समावेश या प्रवक्त्यांच्या यादीमध्धे करण्यात आला आहे.
प्रवक्त्यांनी यादी : सकाळच्या ९ वाजण्याच्या सत्रात आशिष शेलार (अध्यक्ष, भाजप मुंबई, रावसाहेब दानवे (माजी केंद्रीय राज्यमंत्री) पंकजा मुंडे (राष्ट्रीय सचिेव), प्रवीण दरेकर (गटनेता, विधानपरिषद सदस्य) व नितेश राणे (विधानसभा सदस्य) यांचा समावेश आहे. तर संध्याकाळी सायं. ४ वाजताच्या दुस्या सत्रात सुधीर मुनगंटीवार (मंत्री, महाराष्ट्र राज्य), अशोक चब्हाण (राज्यसभा सदस्य), गिरीष महाजन (मंत्री महाराष्ट्र राज्य), माधव भंडारी (प्रदेश उपाध्यक्ष), अतुल भातखळकर (विधानसभा सदस्य), राम कदम (विधानसभा सदस्य) यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
दुपारी ४ वाजता घेण्यात येणाच्या पत्रकार परिषदेसाठी रविंद्र चब्हाण (मंत्री, महारा्ष्ट्र राज्य), धनंजय महाडिक (राज्यसभा सदस्य), संभा्जी निलंगेकर (विधानसभा सदस्य), मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री), संजय कुटे (विधानसभा सदस्य) प्रवीण दटके (विधानपरिषद सदस्य), राम शिंदे (विधानपरिषद सदस्य), श्रीकांत भारतीय (अध्यक्ष, निवडणूक व्यवस्थापन), अमित गोरखे (विधानपरिषद सदस्य), उज्ज्वल निकम (विशेष निमंत्रित सदस्य), आशिष देशमुख (प्रवक्ता, भाजपा), भारती पवार (माजी केंद्रीय राज्यमंत्री), देवियानी फरांदे (विधानसभा सदस्य), चित्राताई वाघ (अध्यक्ष, महिला मौर्चा), हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता), अनिल बोंडे (राज्यसभा सदस्य), सदाभाऊ खोत (विधानपरिषद सदस्य), निरंजन डावखरे (विधानपरिषद सदस्य), अमित साटम (महामंत्री भाजपा मुंबई) अनिकेत निकम यांचा समावेश आहे