रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाईन ५७ हजार ५७२६९ तर ऑफलाईन पध्दतीने १ लाख ६२ हजार ८०८ अर्ज असे एकूण २ लाख २० हजार ७७ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे. जिल्ह्याला एकूण असलेल्या उद्दिष्टापैकी ७४.९४ टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून २९९३७ उद्दिष्टांपैकी अर्ज २८९०४ प्राप्त झाले असून, प्रमाण ९६.५५टक्के आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी, महिला भगिनी घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरु आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट, प्राप्त अर्ज संख्या आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड ८२६६ उद्दिष्टांपैकी अर्ज ६६१४ प्राप्त झाले असून, प्रमाण ८०.०१ टक्के, दापोली ३६५४७ उद्दिष्ट पैकी अर्ज २५९५४ प्राप्त झाले असून प्रमाण ७१.०२ टक्के, खेड ३५५०५उद्दिष्ट पैकी अर्ज १८४७२प्राप्त झाले असून प्रमाण ५२.०३टक्के, चिपळूण ३४३२३ उद्दिष्ट पैकी अर्ज २९७१९प्राप्त झाले असून प्रमाण ८६.५९ टक्के, गुहागर तालुक्यात २९७६६उद्दिष्ट पैकी अर्ज १७६०६ प्राप्त झाले असून प्रमाण ५९.१५ टक्के, संगमेश्वर ३८७१६उद्दिष्ट पैकी अर्ज २७४०२प्राप्त झाले असून प्रमाण ७०.७८ टक्के, रत्नागिरी ६१२५१ उद्दिष्ट पैकी अर्ज ४८७७२ प्राप्त झाले असून प्रमाण ७९.७३टक्के, लांजा तालुक्याला १९३६५ उद्दिष्ट पैकी अर्ज १६६३४प्राप्त झाले असून प्रमाण ८५.९० टक्के, राजापूर तालुक्यात २९९३७उद्दिष्ट पैकी अर्ज २८९०४ प्राप्त झाले असून प्रमाण ९६.५५ टक्के आहे.





