रत्नागिरी : प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आ. सदाभाऊ खोत यांच्या विचारांशी आणि कामाशी प्रेरित होऊन सर्वसामान्य लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार लोकांना अडीअडचणीमध्ये संतोष आरावकर हे मदत करत असतात. तसेच कोरोनाच्या काळामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आणि त्यांचे स्विय्य सहाय्यक शआदिनाथ कपाळे यांच्या सहकार्याने कित्येक रुग्णांना सहकार्य केले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अन्य अनेक आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळवून दिला असून रत्नागिरी जिल्हा आणि विशेषतः राजापूर तालुक्यात आरावकर यांचे काम कौतकास्पद आहे.सामाजिक आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्मातून त्यांनी अनेक विशेष उपक्रम राबवून लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवून जनसेवा केली जात आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय ,तहसिल कार्यालय, राजापूर तहसिल कार्यालय आणि पोलीस स्टेशन येथे सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अरावकर हे नेहमीच आघाडीवर असलेल्याचे दिसून येते त्यामुळेच संतोष आरावकर यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांना वैद्यकीय विभाग आघाडीचे प्रमुख म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भेडसाणाऱ्या समस्याना खऱ्या अर्थाने वाचा फुटणार असल्याने लोकांमधे अंदाचे वातावरण तयार झाले आहे .पक्षाने ठेवलेला विश्वास आणि दिलेली जिल्ह्याची मोठी जबाबदारी यामुळे पक्षाच्या माध्यमातून रयत क्रांती संघटनेचे काम जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे आरावकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.



