रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याचे काम युदधपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत वाहतुकीला पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून या मार्गाने वाहतूक करावी, असे आवाहन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग – वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली- रवाळजे- निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली -रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग – कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.





