• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

किरांच्या रत्नागिरीत महाविकास आघाडीचा बूथ लागलाच नाही!

yogesh by yogesh
June 26, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्या महायुतीचे कार्यकर्ते जोमात

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महायुतीच्या निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीच्या रमेश कीर यांच्यात ही लढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण निवडणुकीचे आहे. मात्र या सर्वात लक्षवेधी गोष्ट ठरली ती कार्यकर्त्यांची बूथ. महायुतीचे मिळून दोन बूथ रत्नागिरी शहरात होते. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे स्थानिक असताना इथे एकही बूथ लागला नव्हता. इथे काँग्रेस कार्यकर्ते दिसले नाहीत. किंबहुना उबाठाचे निवडक कार्यकर्ते सोडले तर बूथ असा लागलेला नाही. महायुती म्हणून भाजपसोबत उदय सामंत यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय विविध संघटनांचे प्रतिनिधी महायुतीच्या बुथवर दिसत होते.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीने जितकी प्रचारात आघाडी घेतली होती. तितकी महाविकास आघाडीने मेहनत घेतल्याचे दिसले नाही. साधारण बूथ लागला की तिथे मतदार येऊन आपली नावे शोधत असतात. त्यातून एक कल समजतो. दुपारी अडीच वाजेपर्यंत हा कल रमेश कीर यांच्या विरोधातील होता. रत्नागिरी शहराचे भूमिपुत्र असताना किर यांचा बूथ लागला नाही, त्यांना प्रचारासाठी मेहनत घेताना कोणी दिसले नाही. महाविकास आघाडी म्हणून प्रचारात एकी दिसली नाही. उबाठा गटाने केलेली नोंदणी पाहता रमेश कीर यांना उमेदवारी देऊन घोळ घातल्याची चर्चा त्यानिमित्ताने रंगली होती. किमान रत्नागिरी शहरात तरी बूथ लागणे अपेक्षित होते. मात्र शहरात सोडा संपूर्ण मतदारसंघात बूथ कमी लागले. त्यामानाने डावखरे यांचे बूथ सर्वाधिक होते.

महायुती म्हणून भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर जातीनिशी लक्ष घालत होते. महायुती म्हणून रत्नागिरी शहरात आज माहोल दिसला. त्याचे फलित निकालात दिसेल, यात शंका नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघेही वेळोवेळी आढावा घेत होते. त्यामुळे महायुती म्हणून रत्नागिरीत भगवे वातावरण होते.

Tags: काँग्रेसनिरंजन डावखरेपदवीधरभाजपमहविकास आघाडीमहायुतीरत्नागिरी
ShareSend
Previous Post

हिंदुस्थानच्या लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा भाजपचे ओम बिर्ला

Next Post

फासकीत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

फासकीत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us