• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

कोकण पदवीधरसाठी २६ जून रोजी मतदान

yogesh by yogesh
June 25, 2024
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी जिल्ह्यात ३८ मतदान केंद्र; २२ हजार ६८१ मतदार बजावणार हक्क

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी उद्या बुधवार २६ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्ह्यामध्ये एकूण २२ हजार ६८१ मतदार संख्या आहे. 

तालुकानिहाय अनुक्रमे मतदान केंद्र आणि मतदार संख्या पुढीलप्रमाणे मंडणगड -१ व ६४५, दापोली ४ व २०३७, खेड ४व २१६८, चिपळूण ८ व ४२४१, गुहागर २ व १६५२, संगमेश्वर ५ व २५४९, रत्नागिरी ९ व ६०८५, लांजा २ व १६१० आणि राजापूर ३ व १६९४.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाहीत, असे मतदार ओळख पटवण्यासाठी पुढील कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतील. आधार कार्ड, ड्राव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र, राज्य, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक समिती अथवा खासगी आस्थापनांनी नोकरदारांना दिलेले ओळखपत्र, संसदेने तसेच विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र, शालेय संस्थेने दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाने दिलेले पदवी/पदविका प्रमाणपत्राची खरी प्रत, दिव्यांग ओळखपत्र.

मत नोंदविण्याबाबत महत्वाच्या सूचना- मतदानाची कार्यपध्दती मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरू नयेत. पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये, ज्यास पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. ‘1’ हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल. निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उदा. जर ५ उमेदवार निवडणूक लढवित असतील आणि फक्त । उमेदवार निवडून द्यावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे 1 ते 5 पसंतीक्रम देऊ शकता. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद केला जाईल याची खात्री करावी आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसेल. “पसंतीक्रम” (Order of Preference) स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I, II, III, इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील १, २, ३ किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व पदवीधर मतदारांनी न चुकता मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Tags: कोकणपदवीधरमतदान
ShareSend
Previous Post

राज्यातील ठेकेदारांचा उपोषणाचा इशारा

Next Post

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल : मुंदडा

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल : मुंदडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us