• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

प्रत्येक मंदिरामध्ये गोशाळा चालू झाल्यास गोरक्षण होईल : मुंदडा

yogesh by yogesh
June 25, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

गोरक्षण करायचे असेल, तर प्रत्येक मंदिरात गोशाळा चालू करावी. इस्कॉनने महाराष्ट्रात २ गोशाळा चालू केल्या आहेत. अन्य काही देवस्थानांसोबत गोशाळा चालू करण्याविषयी आमचे बोलणे झाले आहे. असे केल्यास निश्चित गायीचे रक्षण होईल, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र गो सेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांनी केले. ते गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण’ या सत्रात ‘गोपालनाची आर्थिक नीती’ या विषयावर बोलत होते.

गोवा

या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मध्य प्रदेश राज्यातील हिंद रक्षक संघटनेचे इंदोर येथील अध्यक्ष श्री. एकलव्य गौडा, सर्व ब्राह्मण महासभेचे आंतरराष्ट्रीय संस्थापक पंडित सुरेश मिश्रा आणि राजस्थान येथील संयुक्त भारतीय धर्म संसदेचे अध्यक्ष आचार्य राजेश्वर उपस्थित होते.

श्री. शेखर मुंदडा पुढे म्हणाले की, मनुष्याच्या मृत्यूनंतर जो अंत्यविधी करण्यात येतो त्यासाठी आम्ही गायीच्या शेणापासून सिद्ध होणारे ‘गोकाष्ट’ वापरण्याची संकल्पना पुढे आणली आहे. गोकाष्ट सिद्ध करण्यासाठी लागणारा साचाही आम्ही तयार केला आहे. या माध्यमातून विविध गोशाळांना आर्थिक साहाय्य होईल. गोमाता वाचली, तर देश वाचले. गोमातेला मानतो, तोच खरा हिंदू आहे. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा आहे; मात्र त्यावर कार्यवाही नव्हती. महाराष्ट्रात गो आयोगाची स्थापना झाल्यावर गोहत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. गो संगोपन, गो संरक्षण, गोशाळा, गो शेती, गो पर्यटन, गो साक्षरता यांवर काम करण्याची आवश्यकता आहे. यानुसार काम केले तरच गोमातेला मानाचे स्थान प्राप्त होईल. गायीची महती सर्वत्र पोचण्यासाठी आम्ही देशी गायीवर आधारित ‘जननी’ चित्रपटाची निर्मिती केली असून लवकरच तो प्रदर्शित होईल. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

Tags: गोरक्षाहिंदुत्ववादीहिंदुस्थानहिंदू अधिवेशनहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

कोकण पदवीधरसाठी २६ जून रोजी मतदान

Next Post

विरोध होत असला तरी नेपाळ हिंदु राष्ट्राकडे अग्रेसर! : शंकर खराल

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

विरोध होत असला तरी नेपाळ हिंदु राष्ट्राकडे अग्रेसर! : शंकर खराल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us