• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Sunday, October 19, 2025
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

दहशतवाद विरोधी पथकाला यश, लपलेले घुसखोर शोधण्याचे आव्हान

yogesh by yogesh
May 24, 2025
in माझा हिंदुस्थान
A A
0
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या धडक मोहिमेत पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मार्गाने राहणाऱ्या १३ बांगलादेशींना त्यांच्या देशात हाकलून लावण्यात यश आले आहे. आता जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यात लपलेल्या बांगलादेशीना शोधण्याचे काम या पथकाला करावे लागणार आहे. या घुसखोरांना साथ देणाऱ्या स्थानिक मदतगारांना पकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा सूर जनतेतून उमटत आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाला ११ नोव्हेंबेर २०२४ रोजी एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी १३ बांग्लादेशी नागरिक मिळून आले होते.

वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली अशी या १३ बांगलादेशीची नावे आहेत.

या सर्वांकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली होती.  याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला व या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला व मुदतीमध्ये या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले होते.

याच प्रकरणाची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी ६ महीने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व १३ दोषी बांग्लादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली व या सर्व बांग्लादेशी नागरिकांना दिनांक २० मे २०२५ रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आलेले आहे.

Tags: अवैध घुसखोरपोलिसबांगलादेशीरत्नागिरीहिंदुस्थान
ShareSend
Previous Post

बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Next Post

वैभव खेडेकरांनी केलेल्या नियुक्त्या मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरेंकडून स्थगित

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!
माझा हिंदुस्थान

गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

May 10, 2025
Next Post
वैभव खेडेकरांनी केलेल्या नियुक्त्या मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरेंकडून स्थगित

वैभव खेडेकरांनी केलेल्या नियुक्त्या मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरेंकडून स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us