माहिती देण्यास रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ, भाजपचे संजय निवळकर आक्रमक
रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींनी १४व्या किंवा १५ व्या वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून स्वतः खरेदी केली असल्यास किंवा पंचायत समिती पातळीवर फायर बॉलची खरेदी केली असल्यास त्याची माहिती द्यावी, या माहिती अधिकारात दिलेल्या अर्जावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप भाजपा अनु. जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी जिल्हाधिकाच्यांकडे अर्जाद्वारे केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व त्याची माहिती द्यावी, अशी मागणीही निवळकर यांनी केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी खरेदी केलेल्या फायर बॉलच्या खरेदी किमतीसह इतर माहिती मिळावी, अशी मागणी माहिती अधिकारात रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकाचऱ्याकडे ६ एप्रिल २०२३ मध्ये केली होती. परंतु पंचायत समितीच्या जन माहिती अधिकाऱ्यानी आपला अर्ज १ शिक्षण विभाग पंचायत समितीकड़े वर्ग करीत माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर जन माहिती अधिकाऱ्यानी ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामविकास अधिकाऱ्याकडून ही माहिती घ्यावी, असे कळविले, परंतु पं.स. कडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही.
याबाबत लावण्यात आलेल्या सुनावणीचे पत्रही सुनावणीची तारीख उलटून गेल्यानंतर चार दिवसांनी मिळाले. त्यामुळे पं.स. गटविकास अधिकाऱ्याना याबाबत माहिती देऊन पुन्हा सुनावणी लावण्याची विनंती करण्यात आली. परंतु गटविकास अधिकाच्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप संजय निवळकर यांनी पत्रात केला आहे. याबाबत मुख्य कार्यकारीअधिकारी यांनी देण्यात आलेल्या पत्रासही प्रतिसाद मिळाले नसल्याचे निवळकर यांनी पत्रात म्हटले आहे.
दाल में कुछ काला है! भाजपा अनु. जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागवली असताना ती देण्यास टाळाटाळ होत आहे. याचा अर्थ दाल मे कुछ काला है! जर माहिती देताना जे वास्तव आहे ते देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असतील तर माहिती अधिकाराची ऐशीतैशी होत आहे, म्हणावे लागेल!