रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी गेल्या अनेक दशकापासून महाराष्ट्र व देशभर शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तागटाची पिढी निर्माण करण्याचे कार्य करत आहे. याच अनुषंगाने दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम, धर्मवीर बलिदान मास अश्या अनेक उपक्रमातून भिडे गुरुजी गेली ५ दशके समाज जागृतीचे कार्य करत आहेत. यातून लाखो लोक यांच्या कार्यरत सामील झाली व होत आहेत याच अनुषंगाने श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यान व मार्गदर्शन बैठक दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेतीन वाजता दैवज्ञ भवन हॉलमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानात श्री संभाजीराव भिडे गुरुजी, दुर्गा माता दौड व सुवर्ण सिंहासन खडा पहारा या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीमान रायगडावरती ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना करण्याचा संकल्प २०१७ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या लाखो धारकऱ्यांनी केला होता. त्याच अनुषंगाने येत्या काही दिवसातच श्रीमान रायगडावरील श्री सुवर्ण सिंहासन व तदनंतर खडा पहारा देण्यासाठी धारकरी प्रत्येक तालुक्यातुन एक दिवस हजारोची एक फळी दर दिवशी जाणार आहे. त्याचेच पहारा नियोजन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्य तसेच दुर्गामाता दौड या अनुषंगाने श्री संभाजीराव भिडे गुरुजी मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीमध्ये येणार आहेत. तरी सर्व धारकरी हिंदुत्ववादी धर्माभिमानी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री गणेश गायकवाड यांनी केले.