नाणीज : प्रतिनिधी
मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरील दोघांना धडक देऊन फरार झालेल्या डंपर चालकाला ग्रामस्थांच्या रेट्यामुळे पोलिसांनी अटक केली. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी नाणिज दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या साथीने भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर आणि सहकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना महामार्ग ठेकेदार कंपनीकडून भरपाई सुद्धा देण्यात येणार आहे.
गुरुवारी १९ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डिंगच्या कामासाठी पालीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी (एम एच ०८ ए एम ४९०३) वरील दोघांना नानिज जुना मठ येथे पाठीमागून येणाऱ्या डंपर ने धडक देऊन चालक डंपर सहित फरार झाला होता. या धडकेत दुचाकीवरील अरुण अनंत दर्डी (३५) आणि रामचंद्र देवजी दरडी (६५ दोघेही रा. दरडीवाडी नाणीज हे गंभीर जखमी होऊन मृत झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच संजय निवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथम पाली ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. मात्र या अपघातात चुलते आणि पुतण्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दरम्यान या अपघातप्रकरणी फरार झालेला डंपर चालक शोधण्यासाठी दिवसभर या महामार्गावरील नाणिज, पाली, हातखंबा, खेडशी यासह विविध ठिकाणांच्या सीसीटीव्हीचे फुटेज ग्रामस्थ, पोलीस तपासात होते. माहिती मिळवत होते. दरम्यान संबंधीत चालक हा रत्नगिरीत असल्याची माहिती श्री. निवळकर याना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह ते ठिकाण घेतले आणि ग्रामीण पोलिसांना बोलावून एकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अखेरीस गुरुवारी रात्री उशिरा डंपर (एम. एच. २० इ एल ८११४) सहित त्याचा चालक लीलाधरी महादेव सॉ, (20 रा. रोहनियातंड झुमरीतलया, जि. कोडरमा, राज्य झारखंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६, १२५ (अ, ब )मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, (१, २), १७७ अन्वये गुन्हा दाखल कार्यात आला आहे.
या अपघातात नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली. याबाबत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यासाठी रवी इन्फ्रा कंपनीचे एमडी रवी सिंग, उपठेकेदार राजू कट्यार यांच्याशी ग्रामस्थांसमोर दूरध्वनीवरून चर्चा करून नातेवाईकांना न्याय देण्याची सूचना केली. त्यानंतर तत्काळ रवी सिंग, उपठेकेदार राजू कट्यार यांनीही नातेवाईकांना आर्थिक भरपाई देण्याचे मान्य केले. अपघात घडल्यानंतर फरार डंपर सहीत चालकाचा शोध घेण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांच्यासह वसंत दरडी, संदीप सावंत, चिराग खटकूळ, चिन्मय खटकूळ, प्रशांत संसारे, रविंद्र संसारे, निखिल संसारे, महेश पडवळ, अमित कांबळे, प्रीतम कांबळे, रविंद्र दरडी, मुन्ना भागवत, बंटी सावंत, विनोद पटेल, साहिल खटकूळ, प्रविण खटकूळ, संदीप सरफरे, अमित दरडी, दत्ताराम खावडकर, सुधीर कांबळे, केतन नवाले, नितीन गुरव, आर्यन मांडवकर, पंकज घडशी, बंड्या सावंत, आदित्य सावंत, अक्षय कोकरे, संजय कोकरे, रमेश कोकरे, स्वरुप सुर्वे, आशिष सरफरे, पपू सरफरे, हेमंत कांबळे, पोलीस पाटील नितीन कांबळे, प्रकाश हतपले, प्रदीप हतपले, पिंटया सावंत, माजी सरपंच गौरव संसारे, सुरेंद्र सावंत, विलास बेर्डे, राजेश कामेरकर, हातखंबा युवा सेना विभागप्रमुख अॅड.सुयोग कांबळे, विलास बोंबले यांनी प्रयत्न केले.