• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

घोटाळेबाजांवर कारवाईस टाळाटाळ

yogesh by yogesh
June 16, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली, तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद


रत्नागिरी : प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी मंदिरात घोटाळे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने देऊन एक महिना उलटला आहे; मात्र अद्यापही प्रशासनाकडून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज श्री तुळजाभवानी मंदिराबाहेरील मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयासमोर हिंदुत्वनिष्ठ आणि समविचारी संघटनांनी घंटानाद आंदोलन केले.

यावेळी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, ‘पुजारी मंडळा’चे सदस्य विजय भोसले, ‘जनहित संघटने’चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री. अजय (भैय्या) साळुंके, ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंखे, ‘हिंदु जनजागृती समिती’चे सर्वश्री राजन बुणगे, अमित कदम, विनोद रसाळ, सर्वोत्तम जेवळीकर, संदीप बगडी, सुरेश नाईकवाडी, किरण लोंढे, सूरज लोंढे, श्रीमती पुनाताई होरडे, सौ. कल्पना क्षीरसागर यांसह मोठ्या संख्येने देवीभक्त उपस्थित होते.

वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक चौकशी समितीने लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी १६ जण दोषी ठरवले होते; मात्र त्यांच्यावर अनेक वर्षे झाली, तरी कायदेशीर कारवाई होत नव्हती. तेव्हा ९ मे २०२४ या दिवशी उच्च न्यायालयाने तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र त्याला एक महिना उलटला तरीही प्रशासन निष्क्रिय असून अद्यापपर्यंत दोषींवर गुन्हे नोंद झालेले नाहीत. या प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे नोंद केले नाहीत; तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, तसेच राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी दिला आहे.

Tags: घोटाळातुळजापूरतुळजाभवानी देवस्थानभ्रष्टाचारहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

त्र्यंबकेश्‍वर येथून ओम प्रतिष्ठानद्वारेे प्रसाद शुद्धी चळवळीस प्रारंभ

Next Post

अखेर रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

अखेर रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us