• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

त्र्यंबकेश्‍वर येथून ओम प्रतिष्ठानद्वारेे प्रसाद शुद्धी चळवळीस प्रारंभ

yogesh by yogesh
June 15, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

संत-महंतांसह हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रसाद शुद्धी चळवळ देशभर राबविणार


त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी

सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा धर्मांध भेसळयुक्त पदार्थ मिसळतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी संकल्पना ‘ओम प्रतिष्ठान’, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत-महंत यांच्या पुढाकारातून प्रसादाच्या शुद्धतेसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ ही संकल्पना पुढे आली असून या संकल्पनेचा १४ जून या दिवशी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रारंभ करण्यात आला. या वेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’चे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात विधीवत् पूजन करून अर्पण करण्यात आले. मंदिरात श्री त्र्यंबकेश्‍वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर अनावरण करण्यात आले. या प्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘हर हर महादेव’च्या गजरात ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय संत समिती धर्म समाज, महाराष्ट्र क्षेत्राचे अध्यक्ष महंत आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, ‘ओम प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट, सावरकर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, नाशिक मंचर त्र्यंबकेश्‍वर डोंबिवली, मुंबई, ठाणे आणि पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आणि व्यावसायिक, पुरोहित महासंघाचे नाशिक येथील अध्यक्ष सतीश शुक्ल, धर्मसभेचे वेदशास्त्र, यज्ञविद्या वाचस्पती भालचंद्र शौचे उपस्थित होते. ‘ही चळवळ भारतभर राबवण्यात येईल’, असे ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने रणजित सावरकर यांनी घोषित केले, तर या अभियानास त्र्यंबकेश्‍वर पुरोहित महासंघाचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे त्र्यंबकेश्‍वर येथील पुरोहित महासंघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी घोषित केले.

समस्त हिंदु संघटना आणि संत-महंत, आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती, पुरोहित महासंघ त्र्यंबकेश्‍वर, पुरोहित महासंघ नाशिक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदु समाज या सर्व संघटनांच्या माध्यमातून ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स पाठिंबा देण्यात आलेला आहे.

याप्रसंगी शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘ओम प्रतिष्ठान’कडून ‘ओम प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या सर्व उपक्रमाला माझा पाठिंबा आहे. हे सर्व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शुद्धता राखण्यासाठी केलेला हा उपक्रम आवश्यक असून तो उत्तरोत्तर वाढत जाईल, अशी मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’’

‘ओम प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले, ‘‘ बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. अनेक ठिकाणी हिंदु धर्माला भ्रष्ट करण्यासाठी प्रसादाचे अशुद्धीकरण करून ‘श्रद्धा जिहाद’ चालू आहे. गायीच्या चरबीपासून पेढे बनवले जातात. हिंदूंच्या देवतांना गोमांसाचा नैवेद्य हिंदूंच्या हातून पाप घडावे, या दृष्टीकोनातून हे जाणीवपूर्वक केले जात आहे. असा अशुद्ध प्रसाद येऊ नये, यासाठी ही चळवळ राबवत आहोत.’’

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट म्हणाले, ‘‘या माध्यमातून आता ‘हलाल’ला नक्कीच झटका बसेल; कारण शबरीमलासारख्या प्रसिद्ध देवस्थानामध्येही ‘हलाल’च्या उत्पादनापासून बनवलेला प्रसाद या ठिकाणी दिला जात होता. अनेक मंदिरात असा प्रसाद दिला जातो. या चळवळीमुळे या सर्वांवर आता प्रतिबंध येईल.’’

महंत आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेत शास्त्री म्हणाले ‘‘अशुद्ध प्रसाद देऊन अधर्मियांकडून ‘श्रद्धा जिहाद’ होत आहे. याला आळा बसून यावर मात व्हावी. यासाठी रणजित सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महाराष्ट्रातील जे धर्म अधिष्ठान आहे, त्यामध्ये पुरोहित संघ, वैदिक सनातन धर्म, अखिल भारतीय संत समिती, श्री स्वामी समर्थ केंद्र, मंदिर महासंघ अशा अनेक संघटना आणि धर्माचार्य यांनी अशी रूपरेषा ठरवली. मंदिर परिसरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या पूजा सामुग्रीचे सर्व्हेक्षण करूनच अंती त्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ देण्यात येईल.’’

काय आहे ‘ओम प्रमाणपत्र’

प्रसाद शुद्धी चळवळीअंतर्गत ‘ओम प्रमाणपत्र’ बनवण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात ‘क्यू.आर्. कोड’ देण्यात आला आहे. तो स्कॅन केल्यावर संबंधित मिठाई विक्रेत्याची सर्व माहिती समोर येते. त्यामुळे या प्रमाणपत्राचा कुणी दुरुपयोग करू शकणार नाही. आपण प्रसाद कुणाकडून खरेदी करत आहोत, याची माहिती या प्रमाणपत्रावरून सहज आपल्याला मिळणार आहे.

या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://youtu.be/95gKVGUo_Lw?si=nXie5KItc0tvBj1q

Tags: ओम प्रमाणपत्रहिंदुत्ववादीहिंदुस्थानहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द

Next Post

घोटाळेबाजांवर कारवाईस टाळाटाळ

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

घोटाळेबाजांवर कारवाईस टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us