• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

पंतप्रधान मोदींची नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी

yogesh by yogesh
June 9, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ, नव्या मंत्रिमंडळात ७० जणांचा शपथविधी


दिल्ली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनात एकच जल्लोष करण्यात आला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशविदेशातील तब्बल ८ हजार प्रमुख पाहुणे उपस्थित होते. देशातील अनेक बडे नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि सफाई कामगारहीया सोहळ्याला उपस्थित होते. पंतप्रधान मोदींसोबत ३१ कॅबिनेट आणि ३९ राज्यमंत्री असे एकूण ७० खासदारांनी शपथ घेतली.

पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी २.० सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते, तर राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते. नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी १० वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. तर, रजीनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्यासह अनेक दिग्गज दिसून आले. दरम्यान, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर यासह अनेक नेत्यांना महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालय होते. दरम्यान, आता मोदी ३.० मध्ये एकूण २० नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

कॅबिनेट मंत्री :- राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, सुब्रह्मण्यम जयशंकर, मनोहर लाल, हरदनहल्ली देवगौड़ा कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओरांव, गिरिराज सिंह, अश्वनी वैष्णव, ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेन्द्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ मनसुख मंडाविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील, राव इंद्रजीत सिंह.

राज्यमंत्री :- जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी, जितिन प्रसाद, श्रीपाद यशो नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकुर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, वी सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल,शोभा करांदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारी लाल वर्मा, शांतनु ठाकुर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय तमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रावनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा निखिल खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकुर, तोखन साहू, डॉ राजभूषण निषाद, भूपतिराजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन.

Tags: amit shahabhajapmodi sarkarनरेंद्र मोदीमोदी
ShareSend
Previous Post

‘कोकण पदवीधर’साठी दोन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next Post

जम्मू काश्मीरमधील सुवर्णकारातर्फे मोदींना ३ किलो चांदीचे कमळ भेट

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

जम्मू काश्मीरमधील सुवर्णकारातर्फे मोदींना ३ किलो चांदीचे कमळ भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us