विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू
कन्याकुमारी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मेपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यान साधना करण्यापूर्वी त्यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली. या ४५ तासात ते फक्त नारळ पानी, द्राक्षाचा रस आणि इतर तरल पदार्थ घेतील. या काळात ते ध्यान कक्षातून बाहेर येणार नाहीत. ते ४५ तास मौन पाळणार आहेत.
पंतप्रधान मोदी तामिळनाडूत आले. तामिळनाडूत आल्यावर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये आले. याच ठिकाणी त्यांनी ध्यान धारणा सुरू केली असून जवळपास दोन दिवस ते ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. १ जूनला ते ध्यान साधनेतून बाहेर येतील. इथून निघण्यापूर्वी ते संत तिरुवल्लूवर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतील. तिरुवल्लूवर यांचं स्मारक आणि मूर्त्या या दोन्ही छोट्या बेटांवर उभारण्यात आल्या आहेत.
विवेकानंद रॉक मेमोरिअल समुद्रात आहे. मोदी ४५ तास या बेटावर थांबणार असल्याने या ठिकाणी मोठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी २००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच भारतीय तट रक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात राहणार आहेत. मोदींच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजप नेत्यांनी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीवेळी मोदी केदारनाथ गुहेत ध्यान साधनेला बसले होते. त्यावेळी मोदींच्या टीमने विरोधकांना धोबीपछाड दिला होता. त्यामुळे आता ४०० पार करण्याचे हे संकेत असल्याचे भाजपचे नेते बोलत आहेत.