• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Wednesday, April 15, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

रेवसरेडी सागरी महामार्ग प्रवास होणार वेगवान

yogesh by yogesh
May 25, 2024
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील रेवसरेडी सागरी मार्गावरचा प्रवास सुखकर आणि सुपरफास्ट होणार आहे. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वेगवेगळ्या भागातील पुलांची कामे युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. या सागरी मार्गावरील कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून कोकणचा प्रवास वेगवान होणार आहे. एकीकडे मुंबई – गोवा महामार्ग अर्धवट असताना सागरी महामार्ग आणि नागपूर – मिऱ्या महामार्गाची कामे जलद सुरू करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. त्यामुळे कोकणच्या रस्ते विकासात भर पडणार आहे.

रेवसरेडी सागरी मार्ग कुणकेश्वर तीर्थक्षेत्राच्या अगदी समोरून समुद्राच्या दिशेने जाणार आहे. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या जागी नव्याने पूल उभारला जाणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. याकामासाठी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांनी या पुलाच्या कामासाठी स्वारस्य दाखविले आहे.

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रेवस रेडी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडी येथे मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा उघडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेवस ते कारंजाखाडी पुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तर आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकाॅन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांमध्ये चुरस आहे. या पुलाचा कच्चा आराखडा बनविण्यात आला आहे. हा सागरी पूल १.६ किलोमीटर एवढ्या लांबीचे असणार आहे. या सागरी महामार्गामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पुलाशिवाय या सागरी महामार्गावर अन्य ५ पुलांसाठी नवीन मागविण्यात आल्या आहेत. या सर्व पुलांसाठी ३ हजार १०५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. यामध्ये कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव पूल, बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी पूल, दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर पूल, जयगड खाडीवर तवसाळ-जयगड पूल, काळबादेवी खाडीवरील पूल मंजूर करण्यात आले आहेत.

रेवस रेडी हा सागरी महामार्ग कोकणातील किनाऱ्या लगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.

Tags: कोकणकोस्टल हायवेरत्नागिरीरेवसरेडीसागरी महामार्गसिंधुदूर्ग
ShareSend
Previous Post

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मेपासून भरता येणार

Next Post

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २६ जूनला मतदान

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २६ जूनला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us