• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home होम

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के

yogesh by yogesh
May 21, 2024
in होम
A A
0

नाणीज : प्रतिनिधीजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित नाणीज येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टीट्यूट या प्रशालेचा बारावीचा निकाल सलग चौथ्यावर्षी शंभर टक्के लागला आहे. बारावी सायन्स शाखेत मधुरा उमेश पेठकर हिने व कॉमर्स शाखेत नेहा संतोष गुरव हिने प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवले. सर्व विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.प्रशालेचा सविस्तर निकाल असा- बारावी च्या सायन्स शाखेमध्ये मधुरा उमेश पेठकर हिने ८३.८३ टक्के गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर अस्मिता अजित खटकुळ या विद्यार्थिनींने ८३.५० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. वैष्णवी श्रीकांत लाड या विद्यार्थिनीने ७८.१७ टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याचबरोबर कॉमर्स शाखेमध्ये नेहा संतोष गुरव या विद्यार्थिनीने ८७.६६ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. पूजा संजय वाईरकर या विद्यार्थिनीने ८५.१६ टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व अशितोष ओमप्रकाश पवळे या विद्यार्थ्याने ७२.३३ टक्के गुण प्राप्त करत प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. दोन्ही विभागात पहिल्या तीनमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थान व प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले आहेत. तसेच इन्स्टिट्यूटचे चेअरमन अर्जुन फुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. नाणीज दशक्रोशीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना यामुळे दर्जेदार व पूर्णपणे मोफत शिक्षण घेणे शक्य झाले आहे. येथे उत्तम शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवले जातात. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विविध खेळ, क्रीडा स्पर्धा अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न या प्रशालेमध्ये केला जातो. उत्तम भौतिक सुविधा असलेली इमारत येथे आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, अशा अनेक सुविधा येथे पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. यावर्षीपासून प्रशालेमध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आला आहे.

Tags: नरेंद्राचार्य महाराजनाणिज प्रशालानिकालबारावी
ShareSend
Previous Post

भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपामुळे ठाकरे पितापुत्र लंडनला पळणार

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात एका क्लिकवर ई – शिधापत्रिका सुविधा

yogesh

yogesh

Related Posts

माझी रत्नागिरी

भरधाव गॅसवाहू टँकरची खासगी बसला धडक, २६ शिक्षक जखमी, अपघातानंतर गॅस गळती

June 8, 2025
पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य
होम

पिस्तुल शूटिंग स्पर्धेत प्रथमेश गद्रेला रौप्य

September 25, 2024
शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?
माझं कोकण

शिवपुतळा शिल्पकार आपटेला २६ लाख मग उर्वरित कोणाच्या खात्यात?

September 24, 2024
होम

आता १०० पटसंख्या शाळांना मिळणार मुख्याध्यापक

September 23, 2024
Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात एका क्लिकवर ई - शिधापत्रिका सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us