• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपामुळे ठाकरे पितापुत्र लंडनला पळणार

yogesh by yogesh
May 21, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

भाजप आ. नितेश राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल, पासपोर्ट जप्त करण्याची मागणी


कणकवली : प्रतिनिधी

ज्यांनी आधी सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही तो निवडणुकीचे आकलन करताना दिसतो. ज्याचा पक्षप्रमुख मतदानाच्या दिवशी शेंबड्यासारखा रडत असताना दिसला पराभव काय असतो याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावरचे बारा वाजलेले आणि चार दिवसानंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे. हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेल आहे. निवडणुकीच्या मैदानात हे पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत. मी या निमित्ताने गृह विभागाला विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे आणि कुटुंबाच्या पासपोर्ट जप्त करून घ्यावं. कारण ४ जूनला पराभव होणार आहे, हे सिद्ध झालेल आहे. म्हणून ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारी मध्ये आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुक आउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. यावेळी ते कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, सरळ सरळ स्पष्ट झालेला आहे की महायुतीला मोठ्या ताकतीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदार संघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेला आहे. सगळे आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहेत. आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांच सुरू झालेल आहे हे त्याचाच पुरावा आहे. ते या आपल्या राज्यामध्ये महायुती ४५ चा आकडा गाठत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा मोदीजींच नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेला आहे. आणि ते चित्र आपल्याला ४ जूनला दिसणार आहे.

संजय राऊत यांनी साधी कधी लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवलेली नाही. मतदान कसं होतं. मतदान कसं मिळवायच, यांनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढवली नसेल, पतसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल. तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पहिल संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे यांनी लोकांमध्ये निवडणूक लढवून निवडून यावे.

निवडणुकीचा मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात. लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाही. महिला माता-भगिनी कधीतरी जेवणाची आणि स्वयंपाकाची सगळी काम केल्यानंतर बाहेर मतदानासाठी निघत असतात. ही सगळी विविध पॅटर्न आहे. हे ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनाच कळणार. म्हणूनच त्यांच्या या विश्लेषणाला कोण भीक देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजवून टाकलेली आहे. ४ जून नंतर भिजलेली मशाल किंवा आईस्क्रीमचा कोन घेऊन उभा राहिलेला उद्धव ठाकरे सर्वांना दिसेल. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल चिन्हाचे बटनच दाबायचे नाही असे ठरवलेले असल्यामुळे इथे जास्त मतदान होतं असं म्हणायचं सवालच येत नाही.

पुण्याच्या त्या दुर्घटनेबद्दल आमचे पोलीस किती सतर्क आहेत हे कारवाई होत असताना दिसत आहे. कोणीही कोणतीही दयामाया दाखवलेली नाही. पण संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे की हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख नाहीत. हे महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. म्हणून जसं दिशा सालीयनच प्रकरण लपवा – लपवि केलात सगळे पुरावे नष्ट केले. तसं या पुण्याच्या केस मध्ये होणार नाही. तेव्हा परमवीर सिंग, त्रिमुखे, सचिन वाझे, पोलीस खात्याला कसं वापरलं हे आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेल आहे. म्हणून तर ७२ दिवस सीबीआयला येण्यापासून या लोकांनी रोखलं. म्हणून संजय राजाराम राऊत यांनी तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारने जसं पोलिसांना घरगड्यासारखे वापरत होता, तसं आम्ही करत नाही. तेव्हा तुम्ही परमवीर सिंगला बडतर्फ केलात काय ? तेव्हा कुठल्याही पोलीस आयुक्तांवर चौकशी लावली काय? म्हणून जे काय व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि त्याला शिक्षा व्हायची आहे त्याला शिक्षा होईल. हे आमचं महायुतीच्या सरकार आहे. आणि योग्य पद्धतीने तपास होईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला

संजय राजाराम राऊत आणि त्याचा तो तीन पट भाव काल भांडुप मध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते. मात्र तो प्रयत्न सपशेल फसला. निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत किंवा आजूबाजूची जनता आहे ती सतर्क होती. या दोन्ही राजाराम राऊत यांच्या मुलांना बूथ कॅप्चरिंग करायला दिले नाही. हे काय तुमच्या ममता बॅनर्जींचं वेस्ट बंगाल नाही. हे आमचं महाराष्ट्र आहे. इथे तुम्ही बुथ कॅप्चरिंग करत असताना या दोन भावांची काय अवस्था झाली ते सर्वांनी पाहिला आहे. अक्षरश: त्यांना तिथून पळून जावं लागल. त्याने आम्हाला शिकवू नये. नियम कोण तोडत असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा होईल. याचा अंदाज त्यांनी काल घेतलेला आहे. असा टोला देखील आ. नितेश राणे यांनी लगावला.

Tags: आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेनारायण राणेनितेश राणेनिलेश राणेभाजपशिवसेना
ShareSend
Previous Post

कोकणची पोरं हुशार!

Next Post

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us