• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हायटेक प्रचाराचा झंझावात

yogesh by yogesh
May 19, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराचा झंझावात केला. २६ मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि १८ मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला, तेव्हा भिवंडीत त्यांनी ११५ व्या सभेला संबोधित केले.

दिनांक २६ मार्च रोजी पहिली सभा ही चंद्रपुरातून प्रारंभ झाली. सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची ही सभा होती. ५० वी सभा ही नांदेड उत्तरमध्ये येथे २२ एप्रिल रोजी झाली. १ ते ५० सभांचे अंतर पार करायला २६ दिवस लागले. १०० वी सभा शिवाजीनगर पुणे येथे ११ मे रोजी झाली. त्यामुळे ५१ ते १०० या पुढच्या ५० सभा १५ दिवसांत झालेल्या आहेत. भिंवडीत समारोपाची झालेली सभा ही ११५ वी सभा होती.

पहिली सभा ते आजची शेवटची सभा असे सलग एकूण ५२ दिवस हा प्रचारसभांचा क्रम सुरु होता. या ५२ दिवसांत ११५सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण ६७ मुलाखती दिल्या. यात ३५ मुलाखती या मुद्रीत माध्यमांना, २२ मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर ८ मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या. २ मुलाखती या राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या.

मोदींनी १० वर्षांत केलेला विकास, राष्ट्रहित, आर्थिक मुद्दे, देशाच्या सुरक्षाविषयक मुद्दे, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्थानिक विकासाचे मुद्दे, हिंदूत्त्व अशा विविध बाबी त्यांच्या भाषणातून मांडल्या गेल्या. या संपूर्ण ५ टप्प्यात स्थानिक गरजेनुसार, त्यांनी आपले निवासाचे मुख्यालय ठेवले. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात नागपूर हे मुख्यालय होते. तिसर्‍या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे अशा ठिकाणी मुक्काम केले. चौथ्या टप्प्यात प्रामुख्याने पुण्यात मुक्काम असायचा. पाचव्या टप्प्यात मुंबईत रात्रीचा मुक्काम केला. कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकार्‍यांच्या बैठका असा क्रम सभांनंतर सुरुच असायचा. याशिवाय, संतवचन नावाने संतांचे अभंग, ओवींचा आधार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम समाजमाध्यमांतून दररोज एका ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. सुमारे ४० भागांची ही मालिका राहिली, जी २० मेपर्यंत सुरु राहणार आहे.

Tags: ४००पारamit shahabhajapbjpDevendra fadanvismaharastramodi sarkarmodijinarendra modi
ShareSend
Previous Post

रत्नागिरीतील विमानतळाला सर दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन नाव द्या!

Next Post

नगरमध्ये उबाठा खा. संजय राऊत याच्यावर गुन्हा दाखल

yogesh

yogesh

Related Posts

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’
माझा महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ जूनपासून ‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव’

June 2, 2026
आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी
माझा महाराष्ट्र

आंबा व काजू बागायतदार उद्या ‘वर्षा’वर धडक देणार : राजू शेट्टी

May 14, 2026
गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
माझा महाराष्ट्र

गुटखासाठा बाळगणारा कोल्हापुरातील एकजण अटक, ६.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

April 26, 2026
धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
Next Post

नगरमध्ये उबाठा खा. संजय राऊत याच्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us