भव्य शामियान्यात होणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा
रत्नागिरी : प्रतिनिधी
भाजपचे ब्रँड नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. हजारो कार्यकर्ते कामाला लागले असून दिनांक ३ रोजी रत्नागिरीत भगवे वादळ घोंगवणार आहे. संपूर्ण नियोजनावर राज्याचे बांधकाममंत्री आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे आधारस्तंभ रवींद्र चव्हाण बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अविनाश जाधव, संदीप देशपांडे, उद्योगमंत्री उदय सामंत हे दिग्गज नेते जोरदार बॅटिंग केली. दिनांक ३ मे रोजी भाजपची बुलंद तोफ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मतदारांमध्ये उत्साह निर्माण करणार आहेत. प्रखर देशप्रेमी असणारे अमित शहा रत्नागिरीत येणार असल्याने भाजप महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शामियाना उभारला गेला आहे. गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण नियोजनावर राज्याचे बांधकाममंत्री आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे आधारस्तंभ रवींद्र चव्हाण बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोबतीला लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, युवा नेते अनिकेत पटवर्धन, महिला प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे, महिला जिल्हाध्यक्षा सुजाताताई साळवी, सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, शहराध्यक्ष राजन फाळके, युवा जिल्हाध्यक्ष डॉ. हृषिकेश केळकर, युवा नेते विक्रम जैन, नंदकिशोर चव्हाण आणि सर्व प्रकोष्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.