राजापूर : प्रतिनिधी
कोकणात विकासाचा अजेंडा म्हणजे नारायण राणे! नारायण राणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत त्यामुळे कोकणवासियांना माझी विनंती आहे की कमळावर बटण दाबा आणि कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन असणाऱ्या राणे आणि मोदी यांना भरघोस मताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महायुतीच्यावतीने येथिल राजीव गांधी मैदान येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत फडणवीस बोलत होते.
या सभेला महायुतीचे उमेदवार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, मंत्री दिपक केसरकर, मुंबई बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित आहेत. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात कोरोना काळात लस उपलब्ध होत नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी देशातील शास्त्रज्ञांना एकत्र केले आणि लस तयार करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. आपल्या देशाने लस तयार केली. जगात चौथ्या क्रमांकाचा लस तयार करण्याचा मान आपल्या देशाने कमावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या काही वर्षात सुरक्षेच्या दृष्टीने मोठे निर्णय घेतले २०१९ पासून पाकिस्तानची आपल्या देशात बॉम्ब हल्ले करायची हिम्मत नाही झाली जे काम आपल्या देशाने करून दाखवलं आहे. आपल्या देशात खरी लढाई ही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे. इंडि आघाडीमध्ये २६ पक्षांची खिचडी आहे. इंडि आघाडीकडे फक्त बसायला डबे आहेत, इंजिनच नाही. तुम्ही नारायण राणे यांना निवडून द्या आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी जोडून द्या आणि विकास पर्वाला सुरुवात करा असे आवाहन त्यांनी करत इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने अनेक योजना अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आला. लोकांना माहिती आहे की हे सरकार लुटणारे सरकार नाही. वसुली सरकार आपण मागच्या अडीच वर्षात पाहिले. हे सरकार मोदींसोबत आहे. राणेंच्या डोळ्यात नेहमी कोकण असते. त्यांच्या मनात कोकण असते. मोदींसोबत खासदार म्हणून निवडून गेले तर कोकणात गुंतवणूक आणतील आणि ते मोठी आणि त्यामुळे कोकणचे चित्र बदलेल असेल. मोदीजींनी ५० कोटी लोकांच्या घरी गॅस देण्याचे काम केले. ५५ कोटी घरांमध्ये शौचालय आले, ६० कोटी लोकांच्याकडे पाणी आले. ६० तरुणांना कोटी मुद्रा अंतर्गत कर्ज मिळाले आहे. १० लाखापर्यंत कर्ज मुद्रा योजने मधून मिळाले. आज ३१ कोटी महिला आपल्या पायावर उभ्या आहेत. पुढच्या टर्ममध्ये तरुणींना २० लाखापर्यंत विनाव्याजी मिळणार अशी घोषणा त्यांनी केली आहे.