राजापूर : प्रतिनिधी
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी राजापुरात येत असून येथील राजीव गांधी स्टेडेयमवर सायंकाळी तीन वाजता त्यांची जाहीर प्रचारसभा होणार असल्याची माहिती रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे भाजपचे प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारांना दिली.
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्यावतीने भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्या विजयासाठी एनडीएने जोरदार कंबर कसली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आता खुद्द भाजपचे वरीष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूरात येत आहे. याबाबत भाजपचे या लोकसभा मतदार संघांचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी राजपुरात पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजापूर दौऱ्याची माहिती दिली.
राजापूर शहरातील राजीव गांधी स्टेडियम वर शुक्रवार दिनांक २६ एप्रिलला सायंकाळी तीन वाजता महायुतीची प्रचारसभा पार पडणार आहे. त्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे, रत्नागिरी चे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार शिवसेना नेते किरण सामंत राष्ट्रवादीचे या लोकसभा मतदारसंघांचे समन्वयक अजित यशवंत राव यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रभारी प्रमोद जठार यांनी दिली.