रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय संविधान है बदलणार, अशी अफवा पसरवण्यात येत आहे. पण आम्ही संविधान बदलणार नाही. यातून आमच्याविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आर्थिक प्रगत असावेत, असे आमचे प्रयत्न असल्याचे सूतोवाच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे बोलत होते.
यावेळी ना. रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते किरण सामंत, भाजपा नेते बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, १० वर्षात मोदी साहेबांनी भारताला अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणला. आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करु शकले नाही. कोणत्याही विषयात आमचे पंतप्रधान कमी पडत नाहीत. प्रत्येक विषयावर त्यांची कमांड आहे. गरिबांविषयी आस्था आहे. दहा वर्षात ५४ योजना जाहीर केल्या. कोरोनात मोदी साहेबांनी ८० कोटी जनतेला मोफत धान्य सुरु केले. आजही सुरु आहे. ९१ कोटी ७२ लाख शौचालये दिली. ८ कोटी लोकांना नळ्याने पाणीपुरवठा दिला. पावणे चार कोटी लोकांना घरे दिली. आयुष्यमान योजना सुरु केली. ९०% सबसिडी योजना सुरु केल्या. त्यामुळे मी सांगू इच्छितो, भाजपच्या पाठीशी उभे रहा. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्यात ना. नारायण राणे यांनी दिली.
यावेळी मोठ्या संख्येने बुध्दीजिवी नागरिकांची उपस्थिती होती. राणे पुढे म्हणाले, अडीच वर्ष मी मंत्रीमंडळात आहे. त्यामुळे मला लोकांसाठी विकासकामे करण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या खात्यांतर्गत ८ कोटी उद्योग आहेत. मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास नामदार नारायण राणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला.