योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गात, अमित शहा यांची रत्नागिरीत सभा, देवेंद्र फडणवीस राजापुरात, राज ठाकरेंची तोफ धडाडणार!
रत्नागिरी : प्रतिनिधी
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेते कोकणात सभा घेणार आहेत. मनसेप्रमुख हिंदुजननायक राज ठाकरे यांची तोफ २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत धडाडणार असून राजापूरचे मैदान २६ रोजी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाजविणार आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ महाराष्ट्रदिनी म्हणजे दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्गात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपची मुलुख मैदान तोफ अमित शहा यांची दि.३ मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे.
कोकणचा ढाण्या वाघ म्हणुन नावलौकिक मिळविलेल्या केंद्रीय लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योगमंत्री आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते तळागाळात पोहचत आहेत.
कोकणचे सुपुत्र बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात जोरदार प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. त्याला उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, लोकसभा सहप्रभारी माजी आ. बाळासाहेब माने, आ. शेखर निकम, मनसे नेते अविनाश जाधव यांची साथ मिळत आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे, मा. खा. निलेश राणे, लोकसभा प्रभारी प्रमोद जठार, मा. आ. राजन तेली यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे.
तळागाळात प्रचार सुरू असताना मनसेप्रमुख हिंदुजननायक राज ठाकरे यांची तोफ २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत धडाडणार असून राजापूरचे मैदान २६ रोजी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाजविणार आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ महाराष्ट्रदिनी म्हणजे दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्गात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपची मुलुख मैदान तोफ अमित शहा यांची दि.३ मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यामुळे अवघे कोकणचे वातावरण भगवे होणार आहे.