• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, May 11, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने नाणार बॉक्साईट सुनावणी रद्द!

yogesh by yogesh
May 11, 2026
in माझं कोकण
A A
0
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

रत्नागिरी : प्रतिनिधी

नाणार आणि परिसर गावामधील बॉक्साईट उत्खनन विरोधात १०० टक्के शेतकरी, बागायतदार असताना, अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प केंद्र शासनाने लादू नये, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे, आमदार किरण सामंत यांचीही तिच भूमिका आहे. पंचायत समिती राजापूर एकमताने नाणार बॉक्साईट संदर्भातील सुनावणी रद्द करावी असा ठराव घातला. त्यामुळे होणारी जनसुनावणी रद्द करावी आणि त्यासंदर्भात शासनाला कळवावे, असा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. हे पाऊल आ. किरण सामंत यांच्या पुढाकाराने उचलण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्प परिसरातून आ. सामंत यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजापूर तालुक्यातील बॉक्साईट उत्खनन प्रकल्प जनसुनावणीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, राजापूरचे प्र. प्रातांधिकारी विश्वजीत गाताडे यांच्यासह नाणार आणि परिसर गावातील शेतकरी, आंबा बागायतदार उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, नाणार बॉक्साईट प्रकरणामध्ये लोकांची भूमिका तिच आपली भूमिका तेथील आमदारांची आहे. पंचायत समिती राजापूर एकमताने नाणार बॉक्साईट संदर्भातील सुनावणी रद्द करावी असा ठराव घातला. तेथील आमदार किरण सामंत यांचीही तिच भूमिका होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली. एक दोन खातेदार वगळता १०० टक्के खातेदारांनी विरोधाची पत्रे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहेत. या पार्श्वभूमीवर होणारी जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांनी सहमती दिली, लोकांनी सांगितले तर ठिक आहे. परंतु, 100 टक्के शेतकरी, बागायतदार विरोधात असताना अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प केंद्र शासनाने लादू नये, अशी शेतकऱ्यांची जी भूमिका होती, त्यामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेतली. जनसुनावणीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. पावसाळ्यानंतर लोकांशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन यासंदर्भात असलेला १०० टक्के विरोध सांगितला जाईल.

आंबा कॅनिंगसाठी दर ५० रुपये किलो 

जीआय मानांकित आंबा बागायतदारांना कॅनिंग कंपन्यांकडून मिळणाऱ्या दराबाबत आज बैठक झाली. या बैठकीत एक्झास्टीक कॅनिंग कंपनीने आंबा बागायतदारांना ५० रुपये किलो दर देण्याचे मान्य केले. रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा विकला जात असेल तर अशांवर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दिले.

या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्मा प्रकल्प संचालक विजय बेतीवार उपस्थित होते.पालकमंत्री डॉ. सामंत यांनी एक्झास्टीकच्या वरिष्ठांशी थेट संपर्क साधत आजपासून 50 रुपये करण्याबाबत चर्चा केली. तसेच रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून जर कर्नाटकचा आंबा विकला जात असेल तर यावर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. या समितीत पोलीस उपअधिक्षक, जिल्हा‍ अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे देखील असतील. या समितीने कारवाई करुन कर्नाटक आंब्याच्या गाड्या सील कराव्यात.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सारथी चे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे सुरु करण्याच्या सूचना एमडी महेश पाटील यांना केल्या आहेत. त्यांनी स्वत: सांगितलय की हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सकारात्मक घेऊन जाऊ आणि हे कार्यालय रत्नागिरी येथे सुरु करु अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यापुढे जाऊन सारथीशी निगडीत जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

Tags: किरण सामंतनाणारबॉक्साइट
ShareSend
Previous Post

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

yogesh

yogesh

Related Posts

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!
माझं कोकण

भाजपकडून निष्ठेचे फळ, प्रमोद जठार यांना विधानपरिषदेचे बळ!

April 28, 2026
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक
माझं कोकण

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे देणार ‘वर्षा’वर धडक

April 24, 2026
कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us