मुंबई : प्रतिनिधी
देशभरातील बँकांना मे महिन्यात किती दिवस सुट्टया राहणार याबाबत हे आरबीआयने जाहीर केले आहे. एप्रिल महिना महिना संपण्यास आता फक्त सात दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान पुढील मे महिन्यात बँकांना तब्बल बारा दिवस सुट्ट्या राहणार आहेत.
यामुळे पुढील महिन्यात जर तुम्हाला बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची असतील तर सुट्टीची यादी पाहूनच तुम्हाला कामाचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान आता आपण मे महिन्यात कोणत्या बारा दिवसांसाठी बँका बंद राहतील याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या तारखेला बँकेला सुट्टी राहणार
आरबीआय कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात अर्थातच मे महिन्यात देशातील बँकांना एकूण १२ दिवस सुट्या राहणार आहेत. परंतु, या सर्व सुट्या देशाच्या सर्वच भागात लागू राहणार नाहीत.
म्हणजे प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या बदलणार आहेत. म्हणजे काही राज्यांमध्ये कमाल बारा दिवस सुट्ट्या राहतील तर काही राज्यांमध्ये त्यापेक्षा कमी सुट्ट्या असतील. राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक, तसेच राज्य सरकारांनी मे २०२४ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्यांसह एकूण १२ सुट्या समाविष्ट आहेत.
१ मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिन ( महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी राहणार आहे.)५ मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.८ मे : रवींद्रनाथ टागोर जयंती दिनानिमित्त कोलकत्ता येथील बँका बंद राहतील.१० मे : बसव जयंती, अक्षय तृतीया निमित्त या दिवशी बेंगळुरू येथील बँका बंद राहणार आहेत.११मे : महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने या दिवशी संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.१२मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.१६ मे : राज्य दिन असल्याने गंगटोक येथील बँका बंद राहतील.१९ मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहे.२०मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि बेलापूर येथील बँका बंद राहतील. २३ मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने बहुतांशी ठिकाणी बँका बंद राहणार आहे. २५ मे : चौथा शनिवार असल्याने संपूर्ण भारतभर बँकांना सुट्टी राहणार आहे.२६ मे : रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.