• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी न. प. नळपाणी योजनेचे काम मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर

अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांतील तथ्य तपासण्याचे आदेश

yogesh by yogesh
January 20, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहराची नळपाणी योजना करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शनच्या मालकाने या कामाच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी अनेक बनावट कागदपत्रे तयार केल्याची तक्रार रत्नागिरीच्या न्यायालयात दाखल झाली होती. न्यायालयाने या प्रकरणी अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कागदपत्रांतील तथ्य तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

रत्नागिरी शहरात सुमारे नळपाणी योजना करण्यात आली आहे. या योजनेचे कंत्राट अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. निविदेतील ५० टक्के कामाच्या अनुभवाची अट पूर्ण करण्यासाठी कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार सोलापुरातील मानवाधिकारी सुरक्षा संघाचे जनरल सेक्रेटरी महेश थिटे यांनी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात केली आहे. पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात केलेल्या तक्रारींची दखल न घेतली गेल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. नळपाणी योजनेची निविदा दाखल करण्यासाठी अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने या पूर्वी असे काम केल्या संदर्भातील कोल्हापूर व सांगलीतील जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी तसेच हुपरीतील कामाच्या नावाने बेकायदेशीर प्रमाणपत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीची मूळ नोंदणी वर्ग ४ मध्ये असताना रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेची निविदा भरण्यापूर्वी ३१ दिवस आधी बोगस कागदपत्रांच्या आधारे वर्ग १ चे नोंदणी पत्र मिळवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या नोंदणी पत्रासह इतर कागदपत्रांची शहानिशा न करता अधिकाऱ्यांनी सहाय्य केल्याचेही न्यायालयात केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

न्यायालयाने या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार निविदा प्रक्रियेसाठी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत तपास करून एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात दाखल झालेली ही खासगी तक्रार आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ कागदपत्रांमधील तथ्य तपासत आहेत.

Tags: पाणी योजनाबांधकाम अभियंताबोगस कागदपत्रेमुख्याधिकारीरत्नागिरी नगर परिषद
ShareSend
Previous Post

राजापूर अर्बन बँक : पावणेदोन कोटींचा अपहार, माजी शाखाधिकाऱ्यावर गुन्हा

Next Post

‘वाढवण बंदर’ विरोधात जनक्षोभ; हजारो भूमिपुत्रांचा धडक मोर्चा

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
‘वाढवण बंदर’ विरोधात जनक्षोभ; हजारो भूमिपुत्रांचा धडक मोर्चा

'वाढवण बंदर' विरोधात जनक्षोभ; हजारो भूमिपुत्रांचा धडक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us