राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या फोडकरवाडीतील ग्रामस्थानी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांच्या कामाचा धडाका आणि कार्यशैली पाहून शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. गावातील विकासात सामंत यांचे योगदान सर्वाधिक असल्याने ग्रामस्थांनी भविष्यात एकहाती शिवसेनामय गाव करण्याचा विडा या प्रवेशावेळी उचलला आहे. शत प्रतिशत शिवसेना करण्याच्या आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.
ग्रामीण भागातील तळागाळता शिवसेना पक्ष पोचला पाहिजे. यासाठी आमदार किरण सामंत संघटना वाढीच्या दृष्टीने काम करत आहेत. लांजा राजापूर विधानसभा मतदार संघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक माणसाच्या समस्या सोडवण्याचा ध्यास आमदार किरण सामंत यांनी उचलला असून कशेळी गावच्या फोडकरवाडीतील विकासाठी मी काठीबद्ध असल्याचा शब्द यावेळी आमदार किरण सामंत यांनी दिला आहे.
यावेळी तालुका प्रमुख दीपक नागले, आर.डी.बँक संचालक मुन्ना खामकर,ॲड. शाशिकांत सुतार, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, मनोज आडविलकर,मंडळाचे अध्यक्ष प्रसाद फोडकर सुहास फोडकर अनिल फोडकर मंगेश फोडकर,काशिनाथ फोडकर विद्याधर फोडकर,अक्षय पाटील उल्हास हळदनकर,भिकाजी फोडकर, तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग व युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.




