• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

हिंदी सक्तीविरोधात ‘मराठी शक्ती’ एकवटणार!

मराठी अस्मिता जागृत, ६ जुलैला मराठी बांधवांचा मुंबईत मोर्चा

yogesh by yogesh
June 27, 2025
in माझा महाराष्ट्र
A A
0
हिंदी सक्तीविरोधात ‘मराठी शक्ती’ एकवटणार!

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत हिंदी भाषेला दिले जाणारे प्राधान्य आणि मराठी भाषा व संस्कृतीवर होणाऱ्या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात आता ‘मराठी शक्ती’ पुन्हा एकदा संघटित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत विराट मोर्चाचे आयोजन केले असून, या आंदोलनात सर्वपक्षीय सहभागाची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठी भाषा ही केवळ एक भाषा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी लादली जात आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. हा लढा कोणत्याही पक्षासाठी नाही, तर मातृभाषेसाठी आहे.”

या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेससह विविध साहित्यिक, सामाजिक संघटना, कलाकार, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून, यामुळे हा मोर्चा ‘पक्षविहीन पण मराठी जनतेचा’ ठरणार आहे.

६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटी येथून सुरू होणारा मोर्चा आझाद मैदानावर जाऊन संपेल. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील; केवळ मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या बॅनर्सखाली नागरिक चालत जातील.

मराठी भाषेच्या प्रश्नावर ठाकरे बंधूंनी (राज आणि उद्धव) एकत्र येण्याची शक्यता दिसत असल्याने, हा मोर्चा केवळ भाषिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मराठी मतदारांना पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न मानला जातो आहे. भाषिक विविधता असलेल्या भारतात मातृभाषेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी असा मोर्चा आवश्यक असल्याची भावना मराठी नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, “ही लढाई सत्तेविरुद्ध नाही, तर अस्मितेसाठी आहे,” असा सूर सर्व स्तरांमधून उमटत आहे.

६ जुलैचा हा मोर्चा केवळ एक निदर्शने न राहता, मराठी भाषेच्या हक्कासाठी उभे राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील या चळवळीचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, देशातील भाषिक धोरणावरही दूरगामी प्रभाव टाकतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Tags: मराठी भाषामहाराष्ट्र शासनराज ठाकरेहिंदी सक्ती
ShareSend
Previous Post

शिक्षण विभागाचा सावळागोंधळ! अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर!

Next Post

छ. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
छ. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

छ. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us