• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील ३ दिवस ‘मुसळधार’

प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

yogesh by yogesh
May 22, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील ३ दिवस ‘मुसळधार’

रत्नागिरी : प्रतिनिधी

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात २२ मे २३ मे या कालावधीत रेड अलर्ट व २४ व २५ मे या कालावधीत ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. २२ व २३ मे या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी ५० ते ६० किमी प्रती तास) मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. २४ मे व २५ मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे

२२ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात श्रीमती मनसुर अहमद पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून लागलेल्या आगीत नगरपंचायत घर क्र. २८७/२ चे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून लाईट फिटींगचे नुकसान झाले आहे. शिरगाव येथे शिवराज विजय शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळीसरे येथे जगन्नाथ महादेव शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे दयानंद लिलाधर जाधव यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे प्रकाश तुकाराम जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.   

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२३३ / २२६२४८ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. वीज चमकत असताना विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ०२३५२ – २२६२४८ /२२२२३३. व्हॉटसअप क्रमांक ७०५७२२२२३३, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन ११२. जिल्हा रुग्णालय ०२३५२-२२२३६३. महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१८. तहसिल कार्यालय रत्नागिरी ०२३५२ -२२३१५७, तहसिल कार्यालय लांजा ०२३५२-२३००२४, तहसिल कार्यालय राजापूर ०२३५३-२२२०२७, तहसिल कार्यालय संगमेश्वर ०२३५४-२६००२४, तहसिल कार्यालय चिपळूण ०२३५५-२५२०४४/९६७३२५२०४४, तहसिल कार्यालय खेड ०२३५६- २६३०३१, तहसिल कार्यालय दापोली ०२३५८-२८२०३६, तहसिल कार्यालय गुहागर ०२३५९- २४०२३७, तहसिल कार्यालय मंडणगड ०२३५०-२२५२३६.

Tags: आपत्तीजिल्हाधिकारीपाऊसपाऊस इशारारत्नागिरी
ShareSend
Previous Post

गोव्यात रामराज्यस्वरूप सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!

Next Post

बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी २४८ कोटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us