• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी जाळ्यात!

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल

yogesh by yogesh
March 28, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

रत्नागिरी : प्रतिनिधी

लाचखोर लोकसेवक रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप प्रीतम केदार याला ११ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

लाचखोर लोकसेवक रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रदीप प्रीतम केदार याने तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल पाठवण्याची भीती तक्रारदाराला घातली. असा अहवाल न पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांचे लाचेची मागणी केली. त्यानुसार लोकसेवक केदार यांनी दिनांक २८ मार्च २०२५ रोजी तडजोडीअंती ११ हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.  ती लाच रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. लोकसेवक केदार याने लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८(सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे. यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत. तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदाम यास माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार संगमेश्वर यांनी दिनांक २२ मार्च २०२५ रोजी भेट दिली होती त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते, त्याची भीती लाचखोराने तक्रारदाराला घातली होती.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक फौजदार चांदणे, पो. ह. दीपक आंबेकर, पो.ह. संजय वाघाटे, पो.ह. विशाल नलावडे, पो.अं. राजेश गावकर या पथकाने पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, पोलिस उपअधीक्षक, एसीबी, रत्नागिरी अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनात केली.

Tags: जिल्हा पुरवठा अधिकारीजिल्हाधिकारीरत्नागिरीलाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
ShareSend
Previous Post

छ. संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक उभारणार : डॉ. उदय सामंत

Next Post

रत्नागिरी तालुक्यात होणार तीन औद्योगिक प्रकल्प

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
प्रादेशिक मनोरुग्णालय जिल्ह्यातून बाहेर जाणार नाही : ना. उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यात होणार तीन औद्योगिक प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us