• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

ठेकेदारांकडून साडेनऊ कोटी रॉयल्टी थकित

गौण खनिज उत्खनन : मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या ४ ठेकेदारांना नोटीस

yogesh by yogesh
January 29, 2025
in माझं कोकण
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना गौण खनिज उत्खननाची रॉयल्टी थकवल्याचा फटका बसला आहे. या कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडुन सुमारे साडेनऊ कोटी एवढी रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी) वांद्री (संगमेश्वर) येथे ५१३३४ ब्रास जादा उत्खनन केले आहे. त्यामुळे त्यांना ३ कोटी ८ लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. चेतक इंटरप्रायझेस यांनी हडकरी (चिपळूण) येथे २८६६ ब्रास उत्खनन केले आहे. १७ लाख रॉयल्टी भरावी लागणार आहे. रवी इन्फ्रा या कंपनाने वांद्री (संगमेश्वर) येथीर ५८६४६ ब्रास उत्खनन केले असून २ कोटी ३२ लाख रॉयल्टी भरलेली नाही आणि जे एस म्हात्रे कंपनीने वांद्री (संगमेश्वर) येथे ६६९१० ब्रास काळ्या दगडाचे उत्खनन केल्यामुळे त्यांना ४ कोटी रुपये रॉयल्टी भरावी लागणार आहे.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तेरा तो चौदा वर्षे सुरू आहे. याचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका दिला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले, त्याच्याऐवजी दुसऱ्या कंपन्यांना काम दिले आहे. डिसेंबर २०२५ महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासन या कामावर नजर ठेऊन आहे. त्यामुळे काही प्रमाणात कामाला गती मिळाली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाची रॉयल्टीच भरली नसल्याचे पुढे आले आहे.

महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉय़ल्टी भरलेली नाही. त्यासाठी महसुल विभागाने कोल्हापूर येथील इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) कंपनीकडून या उत्खननाचा सर्व्हे केला. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे.एकुण साडे नऊ कोटी रुपये रॉयल्टी या कंपन्यांकडून थकित आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कंपन्यांना नोटिस बजावली आहे.

Tags: ठेकेदारथकीतमुंबई - गोवा महामार्गरॉयल्टी
ShareSend
Previous Post

पन्हळेतील अनधिकृत मदरसाविरोधात उपोषण सुरूच

Next Post

रत्नागिरी जिल्हा विकासासाठी ८६०.२१ कोटींचे ‘ नियोजन ‘

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
रत्नागिरी जिल्हा विकासासाठी ८६०.२१ कोटींचे ‘ नियोजन ‘

रत्नागिरी जिल्हा विकासासाठी ८६०.२१ कोटींचे ' नियोजन '

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us